उपासाची टिक्की चाट | UPASACHI TIKKI CHAT Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • UPASACHI TIKKI CHAT recipe in Marathi,उपासाची टिक्की चाट, जयश्री भवाळकर
उपासाची टिक्की चाटby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपासाची टिक्की चाट recipe

उपासाची टिक्की चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make UPASACHI TIKKI CHAT Recipe in Marathi )

 • उसळी साठी -1/2 वाटी भिजवलेला साबूदाणा
 • 1/4वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
 • 1 चमचा आलं मिर्ची पेस्ट
 • 1/4 चमचा लाल तिखट
 • 1 चमचा साखर
 • 1/2 चमचा जीरे
 • 1/2 चमचा मिठ
 • 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 1/2चमचा लिंबा चा रस
 • 1 चमचा तूप
 • टिक्की साठी-
 • 1/2 +1/4 कप शिंगाडा पिठ
 • 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
 • 1 चमचा आलं मिर्ची पेस्ट
 • 1/2चमचा जीरे पूड
 • 1/2चमचा /चवीनुसार मिठ
 • सजावटी साठी-
 • 2 चमचे कोथिंबीर मिर्ची ची हिरवी चटणी
 • 2 चमचे चिंच खजुराची गोड चटणी
 • 1/4 कप गोड घुसळलेले दही
 • 2 चमचे लाल अनार चे दाणे

उपासाची टिक्की चाट | How to make UPASACHI TIKKI CHAT Recipe in Marathi

 1. एका पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करा
 2. ह्यात 1/2चमचा जीरे,आणि आलं मिर्ची पेस्ट घाला
 3. आता ह्यात साबुदाणा,शेंगदाणा कूट घालून नीट मिक्स करा.
 4. ह्याच्यात साखर,मिठ, लाल तिखट घालून बिना झाकता 2 मिनटं वाफवून घ्या
 5. आता 1/2 चमचा लिंबा चा रस,कोथिंबीर घालून मिक्स करा आणि एकी कडे ठेवा.
 6. आता टिक्की  साठी बटाटे मॅश करून सर्व साहित्य एकत्र करा 2 गोळे बनवून हातानी टिक्की चा आकार द्या
 7. आता एका वाटीत पाणी घ्या त्यात टिक्की अलगद बुडवून ओली करा
 8. आणि 1/4कप जास्त शिंगाडा पिठा एका प्लेट मध्ये घ्या आणि ओली टिक्की त्यात घोळवून घ्या
 9. दोन्हीं टिक्की अश्यांप्रकारे  तैयार करून तूपात ब्राऊन रंगावर तळून घ्या.
 10. आता एका छान सर्व्हिंग प्लेट मधे 2 टिक्की,टिक्की च्या चारही कडे साबुदाणा उसळ वाढा
 11. साबुदाण्याच्या सगळी कडे गोल आकारात गोड दही घाला
 12. दह्या मधे एक टिम्ब हिरवी चटणी,एक टिम्ब लाल गोड चटणीचा अशा प्रकारे डिश सजवून घ्या
 13. शेवटी अनार चे दाण्यांनी डिश पूर्ण सजवून उपासाची टिक्की चाट सर्व्ह करा.

My Tip:

जर कोथिंबीर उपासाला खात नसाल तर ,साबुदाण्या च्या उसळीत कोथिंबीर आणि हिरवी चटणी नाही वापरली तरी चालेल

Reviews for UPASACHI TIKKI CHAT Recipe in Marathi (0)