BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपासाची टिक्की चाट

Photo of UPASACHI TIKKI CHAT by जयश्री भवाळकर at BetterButter
0
3
0(0)
0

उपासाची टिक्की चाट

Aug-04-2018
जयश्री भवाळकर
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपासाची टिक्की चाट कृती बद्दल

तसे चाट हा प्रकार उत्तर प्रदेशातील चमचमीत डिश आहे.मी ह्याला पारंपरिक प्रकारेच नवीन रूप दिले कि उपवासात खाता येईल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उसळी साठी -1/2 वाटी भिजवलेला साबूदाणा
  2. 1/4वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  3. 1 चमचा आलं मिर्ची पेस्ट
  4. 1/4 चमचा लाल तिखट
  5. 1 चमचा साखर
  6. 1/2 चमचा जीरे
  7. 1/2 चमचा मिठ
  8. 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  9. 1/2चमचा लिंबा चा रस
  10. 1 चमचा तूप
  11. टिक्की साठी-
  12. 1/2 +1/4 कप शिंगाडा पिठ
  13. 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  14. 1 चमचा आलं मिर्ची पेस्ट
  15. 1/2चमचा जीरे पूड
  16. 1/2चमचा /चवीनुसार मिठ
  17. सजावटी साठी-
  18. 2 चमचे कोथिंबीर मिर्ची ची हिरवी चटणी
  19. 2 चमचे चिंच खजुराची गोड चटणी
  20. 1/4 कप गोड घुसळलेले दही
  21. 2 चमचे लाल अनार चे दाणे

सूचना

  1. एका पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करा
  2. ह्यात 1/2चमचा जीरे,आणि आलं मिर्ची पेस्ट घाला
  3. आता ह्यात साबुदाणा,शेंगदाणा कूट घालून नीट मिक्स करा.
  4. ह्याच्यात साखर,मिठ, लाल तिखट घालून बिना झाकता 2 मिनटं वाफवून घ्या
  5. आता 1/2 चमचा लिंबा चा रस,कोथिंबीर घालून मिक्स करा आणि एकी कडे ठेवा.
  6. आता टिक्की  साठी बटाटे मॅश करून सर्व साहित्य एकत्र करा 2 गोळे बनवून हातानी टिक्की चा आकार द्या
  7. आता एका वाटीत पाणी घ्या त्यात टिक्की अलगद बुडवून ओली करा
  8. आणि 1/4कप जास्त शिंगाडा पिठा एका प्लेट मध्ये घ्या आणि ओली टिक्की त्यात घोळवून घ्या
  9. दोन्हीं टिक्की अश्यांप्रकारे  तैयार करून तूपात ब्राऊन रंगावर तळून घ्या.
  10. आता एका छान सर्व्हिंग प्लेट मधे 2 टिक्की,टिक्की च्या चारही कडे साबुदाणा उसळ वाढा
  11. साबुदाण्याच्या सगळी कडे गोल आकारात गोड दही घाला
  12. दह्या मधे एक टिम्ब हिरवी चटणी,एक टिम्ब लाल गोड चटणीचा अशा प्रकारे डिश सजवून घ्या
  13. शेवटी अनार चे दाण्यांनी डिश पूर्ण सजवून उपासाची टिक्की चाट सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर