उपवासाचे लाॅलीपाॅप | Upwasache Lolipop Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upwasache Lolipop recipe in Marathi,उपवासाचे लाॅलीपाॅप, priya Asawa
उपवासाचे लाॅलीपाॅपby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

6

0

उपवासाचे लाॅलीपाॅप recipe

उपवासाचे लाॅलीपाॅप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwasache Lolipop Recipe in Marathi )

  • उकडून मॅश केलेले बटाटे 2 कप
  • किसून घेतलेला रताळे 1 कप
  • राजगिराचे पिठ मोठे 2 चमचे
  • भगर 2 चमचे
  • हिरवी मिरची पेस्ट 1 छोटा चमचा
  • जीरा पावडर 1/2 चमचा
  • कोथिंबीर 1 चमचा
  • शेंदी मीठ चवीनुसार
  • शेंगदाण्याचे तेल शॅलोफ्राय करण्यासाठी
  • ग्रीन चटनी साठी लागणारी सामग्री
  • कोथिंबीर बारीक चिरलेली 1 कप
  • शेंगदाणे 1/2 कप
  • खोबऱ्याचे किस 3 चमचे
  • जीरे 1/2 चमचा
  • हिरवी मिरची 2 ते 3
  • दही 2 चमचे
  • शेंदी मीठ व साखर चवीनुसार

उपवासाचे लाॅलीपाॅप | How to make Upwasache Lolipop Recipe in Marathi

  1. एका बाऊल मध्ये उकडून घेतलेला बटाटा, रताळ्या चे किस, राजगिराचे पिठ हिरवी मिरची ची पेस्ट, कोथिंबीर व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या
  2. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून चौकोबार स्टिक ला गोळा लावून त्याला लाॅलीपाॅप सारखे आकार द्या व तयार लाॅलीपाॅप वर भगर लावुन घ्या
  3. अश्या प्रकारे सगळे लाॅलीपाॅप तयार करून पॅन मध्ये तेल गरम करून मंद आचेवर शॅलोफ्राय करुन घ्या
  4. आपले लाॅलीपाॅप तयार
  5. हिरवी चटणी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करा व मिक्सरमधून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन एकजीव काढून घ्या
  6. हिरव्या चटणी बरोबर लाॅलीपाॅप सर्व करा

My Tip:

लाॅलीपाॅप मंद आचेवर च तळावेत व उलटवताना उलथनी चा साह्याने उलटावे

Reviews for Upwasache Lolipop Recipe in Marathi (0)