फराळी मिसळ | Farali misal Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Farali misal recipe in Marathi,फराळी मिसळ, Manasvi Pawar
फराळी मिसळby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  90

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

फराळी मिसळ recipe

फराळी मिसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Farali misal Recipe in Marathi )

 • एक वाटी साबुदाणा भिजवणे
 • दीड वाटी दाण्याचा कूट
 • चार हिरव्या मिरच्या
 • जिरे दोन चमचे
 • तूप फोडणी साठी
 • मीठ चवीनुसार
 • मिरची पूड १/२ चमचा
 • दोन बटाटे उकडून
 • कोथिंबीर १/२ वाटी चिरून
 • पाव वाटी ओले खोबरे किसून
 • एक वाटी बटाटा सल्ली

फराळी मिसळ | How to make Farali misal Recipe in Marathi

 1. साबुदाणा भिजला की आपण त्याची खिचडी करून घेऊ
 2. फोडणीसाठी तूप गरम करावे
 3. जिरे मिरच्या दाण्याचा कूट आणि साबुदाणा वडा बटाट्याच्या फोडी घालून परतून घ्या
 4. मीठ घालून एक वाफ काढावी आपली खिचडी तयार आहे
 5. थोडी खिचडी थंड होऊ द्यावे
 6. आता शेंगदाण्याच्या आमटी साठी एक वाटी दाण्याचा कुट म्आणि मिरची पूड थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
 7. कढईत तूप गरम झाले की जिरे कढीपत्ता फोडणीला घालून कुटाचे मिश्रण घालावे
 8. आवश्यक ते नुसार पाणी घालावे चवीनुसार मीठ घालावे एक दोन उकळ्या काढाव्यात
 9. आता प्लेटमध्ये सूरवातीला बटाट्याची सल्ली घालावी मग साबुदाणा खिचडी चार तर घालावा शेंगदाण्याची आमटी घालून ओलं खोबरं भरपूर कोथिंबीर बटाट्याची सल्ली घालावी आणि लिंबू पिळावे .
 10. तयार आहे आपली चमचमीत फराळी मिसळ

My Tip:

प्लेटमधे खिचडी घेताना त्यातील मिरचीची तुकडे काढून टाकावे

Reviews for Farali misal Recipe in Marathi (0)