मुख्यपृष्ठ / पाककृती / फराळी मिसळ

Photo of Farali misal by Manasvi Pawar at BetterButter
0
1
0(0)
0

फराळी मिसळ

Aug-05-2018
Manasvi Pawar
90 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फराळी मिसळ कृती बद्दल

ही रेसिपी मी आपल्या बीबी टीमच्या सुधा मॅडम ची आहे.त्यांनी ही पोस्ट टाकली होती मी प्रयत्न केला करण्याचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी साबुदाणा भिजवणे
  2. दीड वाटी दाण्याचा कूट
  3. चार हिरव्या मिरच्या
  4. जिरे दोन चमचे
  5. तूप फोडणी साठी
  6. मीठ चवीनुसार
  7. मिरची पूड १/२ चमचा
  8. दोन बटाटे उकडून
  9. कोथिंबीर १/२ वाटी चिरून
  10. पाव वाटी ओले खोबरे किसून
  11. एक वाटी बटाटा सल्ली

सूचना

  1. साबुदाणा भिजला की आपण त्याची खिचडी करून घेऊ
  2. फोडणीसाठी तूप गरम करावे
  3. जिरे मिरच्या दाण्याचा कूट आणि साबुदाणा वडा बटाट्याच्या फोडी घालून परतून घ्या
  4. मीठ घालून एक वाफ काढावी आपली खिचडी तयार आहे
  5. थोडी खिचडी थंड होऊ द्यावे
  6. आता शेंगदाण्याच्या आमटी साठी एक वाटी दाण्याचा कुट म्आणि मिरची पूड थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
  7. कढईत तूप गरम झाले की जिरे कढीपत्ता फोडणीला घालून कुटाचे मिश्रण घालावे
  8. आवश्यक ते नुसार पाणी घालावे चवीनुसार मीठ घालावे एक दोन उकळ्या काढाव्यात
  9. आता प्लेटमध्ये सूरवातीला बटाट्याची सल्ली घालावी मग साबुदाणा खिचडी चार तर घालावा शेंगदाण्याची आमटी घालून ओलं खोबरं भरपूर कोथिंबीर बटाट्याची सल्ली घालावी आणि लिंबू पिळावे .
  10. तयार आहे आपली चमचमीत फराळी मिसळ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर