मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पिठांचे उपवासाचे अनारसे

Photo of Mix flour Anarase by Bharti Kharote at BetterButter
610
7
0.0(0)
0

मिक्स पिठांचे उपवासाचे अनारसे

Aug-05-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पिठांचे उपवासाचे अनारसे कृती बद्दल

हा उपवासाचा पदार्थ माझ्या आईने मला शिकवलेला आहे. .सोपी पद्धत वापरून. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी वरईच पीठ
  2. एक वाटी साबुदाणा पीठ
  3. एक वाटी राजगिरा पीठ
  4. एक चमचा आंबट दही
  5. एक वाटी गुळ आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. .
  6. तळण्यासाठी तेल /तूप

सूचना

  1. एक वाटी वरईच पीठ एक वाटी साबुदाणा पीठ आणि अर्धी वाटी राजगिरा पीठ एका वाडग्यात घ्या. .
  2. अर्धी वाटी राजगिरा पीठ तसंच राहू दया. .बाकीच्या पीठात गुळ आणि दही घाला. .
  3. पीठ हाताने मिक्स करून घ्या. 15 मी बाजूला ठेवा. .
  4. आता जर पीठ पातळ वाटत असेल तर त्यात आधीच काढून ठेवलेले राजगिरा पीठ घालून चांगल मळून घ्या. .तेलाचा हात लावून छोटे गोळे बनवा.
  5. डीश मध्ये वरईचा रवा घ्या. त्या वर एका बाजूने अनारसे थापून घ्या. ..
  6. कढई गॅस वर ठेवून थोडे तेल तापत ठेवा. .
  7. त्यात रवा लावलेला भाग वरती राहिल अशा पध्दतीने तेलात अनारसा सोडा. .
  8. झारयाने वरच्या बाजूवर तेल टाका. .पलटी मारू नये..
  9. असेच सर्व अनारसे तळून घ्या. .
  10. आणि गरम गरम सर्व्ह करा. .मस्त कुरकुरीत झालेत...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर