उपवासाचे पनीर मखाणा भरलेले अप्पे | Paneer Makhana stuffed Upwas Appe Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paneer Makhana stuffed Upwas Appe recipe in Marathi,उपवासाचे पनीर मखाणा भरलेले अप्पे, Archana Chaudhari
उपवासाचे पनीर मखाणा भरलेले अप्पेby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

उपवासाचे पनीर मखाणा भरलेले अप्पे recipe

उपवासाचे पनीर मखाणा भरलेले अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer Makhana stuffed Upwas Appe Recipe in Marathi )

 • पनीर ४ टेबलस्पून किसून घेतलेले
 • मखाणा २ टेबलस्पून भाजून चुरून घेतलेले
 • दूध २ कप
 • साखर ३ टेबलस्पून
 • वेलची पूड १ चिमूटभर
 • बटाटा ३/४ कप उकडून किसून घेतलेला
 • आरारूट २ टेबलस्पून
 • तेल २ टीस्पून

उपवासाचे पनीर मखाणा भरलेले अप्पे | How to make Paneer Makhana stuffed Upwas Appe Recipe in Marathi

 1. सारणासाठी- दूध उकळायला ठेवा.
 2. दूध उकळल्यावर त्यात पनीर, चुरून घेतलेला मखाणा टाका.
 3. साखर, वेलची पूड टाका.
 4. मिश्रण मध्ये मध्ये हलवत रहा.
 5. मिश्रण पूर्णपणे घट्ट होऊ द्या.
 6. एका भांड्यात सारण काढा.
 7. बटाट्याच्या उकडलेल्या किसामध्ये आरारूट टाकून गोळा बनवून घ्या.
 8. सारण आणि गोळा तयार आहे.
 9. आता बटाट्याच्या गोळ्यांचे लहान लहान सारखे गोळे बनवून घ्या.
 10. एक गोळा घेऊन प्लास्टिकच्या कागदावर त्या गोळ्याची छोटीशी पुरीसारखे बनवून त्यात वरील सारण भरा.
 11. गोळा व्यवस्थित बंद करून घ्या.
 12. याप्रमाणे सगळे गोळे बनवून घ्या.
 13. अप्पेपात्रात थोडेसे तेल टाकून वरील सारण भरलेले गोळे ठेवा.
 14. दोन्ही बाजुंनी छान शेकून घ्या.
 15. पनीर मखाणा भरलेले अप्पे तयार आहेत.

My Tip:

आतील सारण छान कोरडे हवे.

Reviews for Paneer Makhana stuffed Upwas Appe Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo