मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा आप्पे

Photo of Sabudaba aappe by Archana Lokhande at BetterButter
259
3
0.0(0)
0

साबुदाणा आप्पे

Aug-05-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा आप्पे कृती बद्दल

साबुदाणा आप्पे -नेहमीची तीच ती खिचडी नको म्हणून नवीन काहीतरी बनवण्याचा एक प्रयत्न केला आणि खरचं आप्पे खुप छान झाले होते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 3

  1. भिजवलेला साबुदाणा १ वाटी
  2. उकडलेले बटाटे ३
  3. शेंगदाण्याचे कुट १/४ वाटी
  4. दही १/२ वाटी
  5. ४-५ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  6. जिरे १ चमचा
  7. मीठ चवीप्रमाणे
  8. किंचित साखर
  9. साजूक तूप १ चमचा

सूचना

  1. एका वाडग्यात भिजलेला साबुदाणा आणि बटाटे उकडून कुसकरून घेतले.
  2. त्यातच दाण्याचा कुट,मिरची, मीठ,साखर, जिरे आणि दही घालून सर्व छान मिक्स करून घेतले.
  3. आता गँसवर आप्पे पात्र ठेवून गरम केले.
  4. नंतर त्यात थोडे दोन थेंब तुप घालून तयार मिश्रणाचे छोटे थोडे चपटे गोळे करून प्रथम एका बाजूने भाजून घेतले.
  5. त्यानंतर दोन्ही बाजूंनी छान लालसर झाल्यावर खाली काढून दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करा गरमागरम साबुदाणा आप्पे.....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर