उपवास कढी पकोडे | Upavas kadi pakode Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upavas kadi pakode recipe in Marathi,उपवास कढी पकोडे, Deepasha Pendurkar
उपवास कढी पकोडेby Deepasha Pendurkar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

12

0

उपवास कढी पकोडे recipe

उपवास कढी पकोडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upavas kadi pakode Recipe in Marathi )

 • पाव किलो दही
 • एक वाटी राजगिरा पीठ
 • काली मिरी जीरा पावडर
 • उकडलेले बटाटे 4
 • आलंमीरची पेस्ट
 • कडीपत्ता फोडणी साठी
 • लाल मिरची
 • जिरे
 • तेल
 • तूप
 • सेंधाव मीठ
 • कोथिंबीर

उपवास कढी पकोडे | How to make Upavas kadi pakode Recipe in Marathi

 1. दही मध्ये 2 चमचे भरून राजगिरा पीठ घाला
 2. चांगले मिक्स करा
 3. आलंमीरची पेस्ट घाला
 4. काळी मिरी जीरा पावडर घालूनदह्यात मिक्स करा
 5. फोडणी ला तूप घालून जिरे लालमीरची कडीपात घाला
 6. फोडणीत मिक्स केलेले दह्याचे मिश्रण घाला
 7. आणि कढी ढवळत राहा जोपर्यंत उकळी येत नाही
 8. आता एक पातेल्यात उकडलेल्या बटाटा चे बारीक तुकडे घ्या
 9. त्या मध्ये राजगिरा पीठ जीरेमिरी पावडर मीठ घाला
 10. थोडे पाणी किंवा दही घालून मिक्स करा
 11. मिश्रण बटाटाला चिकटले पाहिजे
 12. त्याचे छोटे गोळे करून तळून घ्या
 13. आता हे भाजी कढी मध्ये घालून 1 उकळी येऊ द्या
 14. वरून कोथिंबीर घालून घ्या

My Tip:

भाजी करतांना तेल चांगले तापू द्यावे नाहीतर पीठ तेलात विरघळते

Reviews for Upavas kadi pakode Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo