उपवासाचे मोदक | Upwasache Modak Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  6th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Upwasache Modak recipe in Marathi,उपवासाचे मोदक, Sharwari Vyavhare
उपवासाचे मोदकby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

1

1

उपवासाचे मोदक recipe

उपवासाचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwasache Modak Recipe in Marathi )

 • भगर 25O ग्राम
 • शाबुदाणा १ चमचा
 • मिठ ( सैधव ) चिमुटभर
 • आले खोबरे खोवलेले १ वाटी
 • खिसुन घेतलेला गुळ १ / २ वाटी
 • तुप २ चमचे
 • दुध २ चमचे
 • विलायची पावडर १ / ४ चमचे

उपवासाचे मोदक | How to make Upwasache Modak Recipe in Marathi

 1. भगर व शाबुदाणा मिक्सर मधून बारीक करा
 2. हे मोदकाचे पिठ चाळणीने चाळून घ्या
 3. खोबरे, गुळ, तुप ( १ चमचा ), विलाययी पावडर द्यावी
 4. गॅस वर कढई गरम करायला ठेवा . हे सर्व कढईत टाका
 5. मंद गॅस वर मोदकाच्या आतील सारण बनवा
 6. मोदकाचे पिठ , तुप १ चमचा , दुध २ चमचे चवीप्रमाणे मिठ घ्या
 7. एका भांड्या मध्ये १ कप पिठाला १ कप पाणी घ्या
 8. त्यामध्ये दुध, तुप , मिठ, घाला .
 9. पाणी उकळायला लागले की मोदकाचे पिठ घाला व मिक्स करा
 10. १० मि झाकून ठेवून दया
 11. १o मि मिश्रण ताटा मध्ये कढा
 12. हाताला कोमट पाणी लावा व मिश्रण मळून घ्या
 13. मिश्रणा मधील मध्यम आकाराचा गोळा घ्या
 14. त्याची पारी बनवा या मध्ये सारण भरा व मोदकाचा आकार दया ( पारीला जवळ जवळ अंतरावर छोट्या छोट्या प्लेटस घ्या )
 15. अशा प्रकारे सर्व मोदक बनवा
 16. मोदक पात्रा मध्ये पाणी गरम करायला ठेवा
 17. मोदक स्टॉडला तुप लावा त्यावर सर्व मोदक ठेवा
 18. वर झाकण ठेवून मोदक १५ मि वाफवून घ्या
 19. मोदक फोडून तुपाची धार सोडा मग खा

My Tip:

तांदळाच्या मोदका पेक्षा भगरचे मोदकाचे पिठ चिकट असते. मोदक बनवताना हाताला पिठ चिटकते तर हाताला कोमट पाणी लावा मग मोदक बनव

Reviews for Upwasache Modak Recipe in Marathi (1)

Poonam Nikam3 months ago

wow
Reply
Sharwari Vyavhare
3 months ago
thank you dear....