कलरफुल मोदक | Colorful Modak Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Colorful Modak recipe in Marathi,कलरफुल मोदक, Sharwari Vyavhare
कलरफुल मोदकby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

कलरफुल मोदक recipe

कलरफुल मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Colorful Modak Recipe in Marathi )

 • भगर २५० ग्राम
 • शाबुदाणा १ चमचा
 • खोवलेले ओले खोबरे १ वाटी
 • गुळ १ वाटी
 • विलायची व सुंठ पावडर १ / 2 चमचा
 • सेंधव मिठ चिमुटभर
 • तुप २ चमचे
 • दुध २ ते 4 चमचे
 • लाल कलर
 • हिरवा कलर
 • पिवळा कलर

कलरफुल मोदक | How to make Colorful Modak Recipe in Marathi

 1. भगर , शाबुदाणा मिक्सरमधून बारीक पिठ करावे व चालळून घ्यावे
 2. खोबरे, गुळ, तुप, सुंठ, व विलायची पावडर घ्यावे
 3. गरम कढई सर्व जिन्नस टाकावे मंद गॅस वर सारण बनवावे
 4. मोदकाचे पिठ, मिठ, दुध, तुप घ्यावे
 5. जितके पिठ ( १ वाटी पिठास १ वाटी पाणी ) तेतकेच पाणी घ्या
 6. पाणी, दुध तुप मिठ एका भांड्या मध्ये घ्या
 7. पाणी उकळायला लागले की पिठ घालून मिक्स करा
 8. १० मि पिठ झाकून ठेवा
 9. १० मि ने प्लेट मध्ये काढा
 10. हाताला कोमट पाणी लावा पिठ मळून घ्यावे
 11. तयार पिठाचे गोळे घ्या व चार वेगवेगळे रंग पिठामध्ये मिक्स करा
 12. हे गोळे एकमेंन जवळ ठेवा
 13. गोळे हातामध्ये गोळे घ्या व हळूहळू त्याची पारी बनवा
 14. त्यामध्ये तयार सारण भरा व मोदक बनवा
 15. मोदक पात्रा मध्ये पाणी गरम करायला ठेवा
 16. मोदक स्टॉडला तुप लावा त्यावर मोदक ठेवा
 17. मोदका वर थोडे तुप सोडा
 18. मोदक १५ मि वाफवून घ्या
 19. गरम गरम मोदक तुपा सोबत खावेत
 20. मोदक फोडुन त्या मध्ये तुप सोडावे मग खावे

My Tip:

मोदक वाफवाताना मोदकावर तुप सोडले तर मोदक चमक मारतात

Reviews for Colorful Modak Recipe in Marathi (0)