ड्राय फ्रूट चे मोदक | Dry fruit che modak Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  6th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dry fruit che modak recipe in Marathi,ड्राय फ्रूट चे मोदक, seema Nadkarni
ड्राय फ्रूट चे मोदकby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

ड्राय फ्रूट चे मोदक recipe

ड्राय फ्रूट चे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dry fruit che modak Recipe in Marathi )

 • 1/2 कप राजगिय्याचे पीठ
 • 1/2 कप वरी तांदूळ चे पीठ
 • 1/4 कप खोबऱ्याचे किस
 • 1/4 कप शेंगदाण्याचा कूट
 • 1 चमचा काजू ची भरड
 • 1 चमचा बदाम ची भरड
 • 1 चमचा खारीक ची भरड
 • 1 चमचा अंजीर व जरदाळू चे छोटे छोटे तुकडे
 • 1/4 कप पीठी साखर
 • 2 चमचा तूप
 • 1/2 ग्लास बर्फ चे पाणी
 • तळण्यासाठी तेल किंवा तुप

ड्राय फ्रूट चे मोदक | How to make Dry fruit che modak Recipe in Marathi

 1. प्रथम एका बाउल मध्ये राजगिय्याचे पीठ व वरी तांदूळ चे पीठ एकत्र करून त्यात तूपाचे मोहन घालून थंड पाण्याने घट्ट पीठ मळून घ्या.
 2. एका भांड्यात काजू+ बदाम + शेंगदाण्याचे कूट+ खोबऱ्याचे कीस + अंजीर व जरदाळू चे छोटे छोटे तुकडे + पीठी साखर एकत्र करून सारण तयार करावे
 3. त्यात वेलची पावडर घालून एकत्र करावे व कणीक चे पारी बनवून त्यात ड्राय फ्रूट चे सारण भरून मोदक चे आकार तयार करावे.
 4. तेलात किंवा तुपात तळून घ्यावे.

My Tip:

कणिक मळताना बफॅ च्या पाण्याने मळावे.

Reviews for Dry fruit che modak Recipe in Marathi (0)