मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफींग पनीर ड्रायफ्रूटस उपवासाचे दिवे

Photo of Stuffed Paneer Dryfruits Dive by Bharti Kharote at BetterButter
431
6
0.0(0)
0

स्टफींग पनीर ड्रायफ्रूटस उपवासाचे दिवे

Aug-06-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफींग पनीर ड्रायफ्रूटस उपवासाचे दिवे कृती बद्दल

खर तर उपवासाचे मोदक करायला घेतले. ..पण काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून हा प्रयत्न. ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. कव्हर बनवण्यासाठी
  2. एक वाटी शिंगाडा पीठ
  3. एक चमचा तेल
  4. चवीनुसार मीठ
  5. पाव चमचा जीरे पूड
  6. आवश्यकतेनुसार पाणि
  7. सारणासाठी. .....
  8. एक वाटी पनीर खिसून
  9. दोन चमचे ओले खोबरे खिसून
  10. पाव चमचा जीरे
  11. पाव चमचा आल खिसून
  12. 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  13. दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
  14. तळलेले शेंगदाणे दोन चमचे
  15. तळलेले काजू एक चमचा
  16. तळलेले बदाम खिसमिस एक चमचा
  17. तळलेले खारे पिस्ता एक चमचा
  18. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. कव्हर बनवण्यासाठी
  2. एका वाडग्यात शिंगाडा पीठ घेऊन त्यात मीठ जीरे पूड आणी तेल घातले. ..
  3. नंतर त्यात पाणी घालून गोळा मळून घेतला. .
  4. आता त्याचे गोळे बनवून घेतले
  5. एकीकडे गॅस वर कढाई ठेवून त्यात तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या आल घातले. .
  6. नंतर त्यात पनीरचे खीस खोबरे खीस घालून परतून घ्या. .कोथिंबीर मीठ घालून चांगल मिक्स करून एका डीश मध्ये काढून घेतले. .
  7. त्यांच कढई मध्ये तेल टाकून शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटस तळून घेतले. .आणि सारणात मिक्स करून घेतले. ..
  8. आता पिठाचे गोळे घेऊन त्याचे छोट्या पूरया लाटून घेऊन त्यात सारण भरले....
  9. आता त्याचे हाताने भरीव दिवे तयार केले. .
  10. गॅस वर कढाई ठेवून तेल तापत ठेवले. .त्यात एक एक दिवा सोडून तळूण घेतले. .
  11. छान खरपूस तळले ..
  12. फुलांची सजावट केली. .
  13. आरती केली आणि खायला दिलेत..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर