बटाट्याची फुले | Potato flowers Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato flowers recipe in Marathi,बटाट्याची फुले, Archana Chaudhari
बटाट्याची फुलेby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  120

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

बटाट्याची फुले recipe

बटाट्याची फुले बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato flowers Recipe in Marathi )

 • साबुदाणा १ वाटी भिजवून घेतलेला
 • बटाटे २ मध्यम उकडून घेतलेले
 • हिरवी मिरची २
 • जिरे १/२ टीस्पून
 • आले १/४ इंच
 • लिंबू रस १/२ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी

बटाट्याची फुले | How to make Potato flowers Recipe in Marathi

 1. छान भिजवलेला साबुदाणा कढईत टाकून 5 मिनिटे कमी गॅस वर गरम करून घेणे.
 2. एका ताटात वरील साबुदाणा ठेवून ५ दिवस घरातच वाळत ठेवा.
 3. ५ दिवसांनंतर साबुदाणा छान वाळलेला असेल.
 4. हिरवी मिरची, आले,जिरे कुटून घ्या.
 5. एका भांड्यात बटाटा किसून घ्या,त्यात वरील मिरचीचे वाटण,मीठ लिंबू घाला.
 6. त्याचे लहान लहान गोळे करून घ्या.
 7. हे गोळे वरील वाळवलेल्या साबुदाण्यावर थोडेसे दाबून दाबून घोळवून घ्या.
 8. याप्रमाणे सगळे गोळे करून घ्या.
 9. कढईत तेल तापले की हे गोळे तेलात हळुवार टाळून घ्या.
 10. या प्रमाणे
 11. बटाट्याची फुले तयार आहेत.

My Tip:

साबुदाणा जरा जास्त वेळ घोळवा.

Reviews for Potato flowers Recipe in Marathi (0)