मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा बटाटा रोल

Photo of Potato Staffing Roll by Bharti Kharote at BetterButter
587
3
0.0(0)
0

उपवासाचा बटाटा रोल

Aug-07-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा बटाटा रोल कृती बद्दल

श्रावण महिना नवराञ म्हटल की खूप उपवास करावे लागतात. .म नेहमीच साबुदाणा खिचडी खाऊन मन ऊबून जात..काहीतरी नवीन म्हणून हा पदार्थ सुचला म.काय दरवर्षी नवराञ श्रावण आला की असे चमचमीत पदार्थ बनवले जातात. ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कव्हर बनवण्यासाठी
  2. रूचिराचे शिंगाडा पीठ
  3. दीड चमचा लाल तिखट
  4. पाव चमचा आल खिसून
  5. पाव चमचा जीरे पूड
  6. एक चमचा गरम तेलाचे मोहन
  7. चवीनुसार मीठ
  8. आवश्यकतेनुसार पाणि
  9. स्टफींग साठी
  10. मध्यम आकाराचे ऊकडलेले बटाटे दोन
  11. 3/4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  12. पाव चमचा जीरे
  13. दोन चमचे कोथिंबीर
  14. दोन चमचे ओले खोबरे खिसून
  15. दोन चमचे तळलेले शेंगदाणे
  16. एक टेबलस्पून तेल
  17. चवीनुसार मीठ
  18. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. ऊकडलेले बटाटे कुस्करून घेतले. ..
  2. कढाई गॅस वर ठेवून थोडे तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या घालून बटाटे घातले. .
  3. त्यात मीठ खोबरे खीस कोथिंबीर घालून चांगल मिक्स करून परतून घेतले.
  4. तळलेले शेंगदाणे घालून मिक्स करून घेतले. .
  5. त्याचे रोल बनवले. ..
  6. आता एका वाडग्यात शिंगाडा पीठ घेऊन लाल तिखट मीठ आल जीरे पूड घातली. ..
  7. तेलाचे मोहन आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून बॅटर तयार केले. ..
  8. गॅस वर कढाईत तेल तापत ठेवले. ..
  9. बॅटर मध्ये बटाटा रोल बुडवून तेलात सोडले. .
  10. तेलात डीप फ्राय करून घेतले. .
  11. छान खरपूस तळले. .
  12. झणझणीत खोबरे चटणी सोबत सर्व्ह केले. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर