मिक्स्ड फ्रुट योगर्ट पारफे | Mixed Fruit Yogurt Parfait Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mixed Fruit Yogurt Parfait recipe in Marathi,मिक्स्ड फ्रुट योगर्ट पारफे, Shubha Salpekar Deshmukh
मिक्स्ड फ्रुट योगर्ट पारफेby Shubha Salpekar Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  3

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  3

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

About Mixed Fruit Yogurt Parfait Recipe in Marathi

मिक्स्ड फ्रुट योगर्ट पारफे recipe

मिक्स्ड फ्रुट योगर्ट पारफे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mixed Fruit Yogurt Parfait Recipe in Marathi )

 • 1 मोठी वाटी चक्का (बांधलेले दही)
 • 1 टीस्पून पिठी साखर
 • 2 टेबल स्पून सुक्या मेव्या ची भरड ( अक्रोड+बदाम+काजू+पिस्ता+थोडी साखर)
 • 3/4 वाटी मिश्र फळांचे काप ( कीवी, सफरचंद, डाळिंब)
 • 1 टेबल स्पून स्ट्राबेरी क्रश
 • 1 टेबल स्पून ऑरेंज क्रश
 • 1 टीस्पून बदाम पिस्त्याचे काप आणि किशमिश

मिक्स्ड फ्रुट योगर्ट पारफे | How to make Mixed Fruit Yogurt Parfait Recipe in Marathi

 1. एक ग्लास मध्ये सगळ्यात आधी 1 टेबलस्पून सुक्या मेव्याची भरड टका।
 2. आता याच्यावर गोड चक्क्याची (1 वाटी चक्का+1टीस्पून किंवा आवडीनुसार साखर) आणि फळांची एक एक लेअर बनवून घ्या।
 3. याच्या वर पुन्हा सुक्या मेव्याची भरड, चक्का आणि फळं घालून लेयर्स बनवून घ्या।
 4. वरून ऑरेंज क्रश, स्ट्राबेरी क्रश आणि बदाम, पिस्ता, किशमिश घालून काही वेळ फ्रीज मध्ये सेट करायला ठेवून द्या।
 5. थंडगार पारफे सर्व्ह करा।

Reviews for Mixed Fruit Yogurt Parfait Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo