उपवासाचे चटणी बॉम्ब | Upwasa che chuntney bomb Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  8th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upwasa che chuntney bomb recipe in Marathi,उपवासाचे चटणी बॉम्ब, Rohini Rathi
उपवासाचे चटणी बॉम्बby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  3

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

उपवासाचे चटणी बॉम्ब recipe

उपवासाचे चटणी बॉम्ब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwasa che chuntney bomb Recipe in Marathi )

 • चटणी बनवण्यासाठी
 • कोथंबीर एक कप
 • हिरवी मिरची एक
 • शेंगदाणे 3 tbsp
 • मीठ चवीनुसार
 • जिरे पाव टीस्पून
 • पाणी एक टेबल स्पून
 • बॉम्ब बनवण्यासाठी
 • भिजवलेला साबुदाणा एक कप
 • उकडलेले बटाटे दोन
 • लाल मिरची पावडर 1 teaspoon
 • मीठ चवीनुसार
 • वरीच्या तांदळाचे पीठ पाव कप
 • तेल तळण्यासाठी

उपवासाचे चटणी बॉम्ब | How to make Upwasa che chuntney bomb Recipe in Marathi

 1. साबुदाणा स्वच्छ धुवून दोन ते तीन तास भिजत घालावा
 2. सर्वप्रथम चटणी बनवण्यासाठी सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक वाटून घ्यावे
 3. बॉम्ब बनवण्यासाठी भिजलेला साबुदाणा व उकडलेले बटाटे मॅश करून घ्यावे
 4. त्यात लाल मिरची पावडर वरईचे पीठ व मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
 5. तयार पिठाचे छोटा गोळा बनवणे त्यात चटणी staff करून घ्यावी
 6. Staff केलेली चटणी व्यवस्थित आत मध्ये घालून वरून थोडेसे साबुदाण्याचे पीठ घेऊन गोळा बनवून घ्यावा
 7. अशाप्रकारे सर्व पिठाचे चटणी बॉम्ब बनवून घ्यावे
 8. कढईत तेल गरम करून तयार चटणी बॉम्ब मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे
 9. तळून झाल्यानंतर टिशू पेपरवर काढून घ्यावे
 10. अशाप्रकारे तयार उपवासाची चटणी बॉम्ब चटणी बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

चटणीत पाणी खूप थोडे घालावे नाहीतर वडे तेलामध्ये फुटतात

Reviews for Upwasa che chuntney bomb Recipe in Marathi (0)