मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे चटणी बॉम्ब

Photo of Upwasa che chuntney bomb by Rohini Rathi at BetterButter
0
6
0(0)
0

उपवासाचे चटणी बॉम्ब

Aug-08-2018
Rohini Rathi
190 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे चटणी बॉम्ब कृती बद्दल

साबुदाणा वडा तर आपण दरवेळेस खातो पण त्यात चटणी स्टोप करून बनवलेले हे चटणी बॉम्ब खाण्यास खूप स्वादिष्ट लागतात

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • सोपी
 • नवरात्र
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. चटणी बनवण्यासाठी
 2. कोथंबीर एक कप
 3. हिरवी मिरची एक
 4. शेंगदाणे 3 tbsp
 5. मीठ चवीनुसार
 6. जिरे पाव टीस्पून
 7. पाणी एक टेबल स्पून
 8. बॉम्ब बनवण्यासाठी
 9. भिजवलेला साबुदाणा एक कप
 10. उकडलेले बटाटे दोन
 11. लाल मिरची पावडर 1 teaspoon
 12. मीठ चवीनुसार
 13. वरीच्या तांदळाचे पीठ पाव कप
 14. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. साबुदाणा स्वच्छ धुवून दोन ते तीन तास भिजत घालावा
 2. सर्वप्रथम चटणी बनवण्यासाठी सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक वाटून घ्यावे
 3. बॉम्ब बनवण्यासाठी भिजलेला साबुदाणा व उकडलेले बटाटे मॅश करून घ्यावे
 4. त्यात लाल मिरची पावडर वरईचे पीठ व मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
 5. तयार पिठाचे छोटा गोळा बनवणे त्यात चटणी staff करून घ्यावी
 6. Staff केलेली चटणी व्यवस्थित आत मध्ये घालून वरून थोडेसे साबुदाण्याचे पीठ घेऊन गोळा बनवून घ्यावा
 7. अशाप्रकारे सर्व पिठाचे चटणी बॉम्ब बनवून घ्यावे
 8. कढईत तेल गरम करून तयार चटणी बॉम्ब मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे
 9. तळून झाल्यानंतर टिशू पेपरवर काढून घ्यावे
 10. अशाप्रकारे तयार उपवासाची चटणी बॉम्ब चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर