उपवासाचा केक | Upavasacha kek Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  8th Aug 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Upavasacha kek recipe in Marathi,उपवासाचा केक, Pranali Deshmukh
उपवासाचा केकby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

2

उपवासाचा केक recipe

उपवासाचा केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upavasacha kek Recipe in Marathi )

 • शिंगाडा पीठ 1 कप
 • साखर पाऊण कप
 • अंजीर 5-6
 • खजूर 6-7
 • दूध 1/2 कप
 • तूप 1/4 कप
 • बेकिंग पावडर 1/2 tbs
 • बेकिंग सोडा 1/4 tbs
 • डेसिकेटेड कोकोनट 1 tbs

उपवासाचा केक | How to make Upavasacha kek Recipe in Marathi

 1. साहित्य जमवून घ्या
 2. अंजीर आणि खजूर गरम पाण्यात एक तास भिजत घाला.
 3. अंजीर आणि सीडलेस खजूर मिक्सरमधून स्मूथ पेस्ट करून घ्या गरज वाटल्यास थोडं दूध घालून जरा पातळ पेस्ट तयार करा.
 4. शिंगाडा पीठ बेकिंग सोडा बेकिंग पावडर गाळून घ्या.
 5. एका बाउल मध्ये पेस्ट ,शिंगाडा पीठ आणि साखर एकजीव करून घ्या
 6. मिश्रण खूप घट्ट झाले तर थोडे दूध घालून मिक्स करा .
 7. मायक्रोवेव्ह प्रीहीट करा केकटीनला तुपानी ग्रीसिंग करून बटर पेपर तळाशी लावा
 8. आता तयार मिश्रण टीनमध्ये टाका टॅप करा आणि 180°ला 30 मिनिट बेक करा.
 9. टूथपिक घालून चेक करा जर केक टुथपिकला चिपकला नाही तर केक बेक झाला समजायचं .
 10. थंड झाल्यावर कूलिंग रॅकवर ठेवा किंवा सुरीने कडा मोकळ्या करून डिमोल्ड करा .
 11. आता पिसेस कट करा हवं असल्यास व्हीप क्रीमने फ्रॉस्टिंग पण करू शकता.
 12. मी सुक्या नारळाच्या चुऱ्याने गार्निश केलय .
 13. मस्त उपवासाच्या दिवशी फराळाऐवजी तुम्ही हा केक पण खाऊ शकता.

Reviews for Upavasacha kek Recipe in Marathi (2)

deepali oak3 months ago

A1....:thumbsup: :thumbsup: :thumbsup:
Reply
Pranali Deshmukh
3 months ago
thanx dear

Poonam Nikam3 months ago

wow superb recipe dear
Reply
Pranali Deshmukh
3 months ago
thanx poonam