मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा पुरी

Photo of Amaranth puri or Rajgira Puri by Sujata Hande-Parab at BetterButter
1044
3
0.0(0)
0

राजगिरा पुरी

Aug-08-2018
Sujata Hande-Parab
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा पुरी कृती बद्दल

महाराष्ट्रा मध्ये राजगिरा हा खूपच प्रचलित पदार्थ आहे. उपवास म्हटलं कि राजगिरा हे आवर्जून खाल्ले जाते. राजगिरा लाडू, पुरी, खीर, किंवा थालीपीठ असे विविध पदार्थ बनविता येतात. राजगिरा हा अमरिंथ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून बनते आणि आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. त्यामध्ये कॅलसिम, प्रोटेइन्स , अमिनो ऍसिड्स, आयर्न, मॅग्नेशियम, आणि व्हिटॅमिन अ, ब, क मोट्या प्रमाणावर असते. राजगिरा पुरी आणि बटाटा भाजी किंवा शेंगदाणा चटणी हि आमच्या घरातील पारंपरिक फराळी रेसिपी आहे. ती आज मी इथे शेअर करत आहे. खुपच चविष्ट आणि सोपी अशी हि रेसिपी सगळ्यांनी एकदा जरूर करून पाहावी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अमरिंथ किंवा राजगिरा पीठ – २ कप •
  2. बटाटा उकडलेला आणि किसलेला - १ मध्यम •
  3. मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार •
  4. साखर - १/२ टीस्पून •
  5. आमचूर पावडर – ¼ टीस्पून •/ लिंबू रस -१/२ टीस्पून
  6. जिरा - ¼ थ टीस्पून •
  7. तेल - १ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + २ कप फ्रयिंग •
  8. पाणी पीठ मळण्यासाठी - १/४ थ कप किंवा गरजेनुसार
  9. सर्विंग साठी - फ्रेश खोबरे चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी 

सूचना

  1. परातीत किंवा बाउल मध्ये राजगिरा पीठ घ्या.
  2. त्यात तेल घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. मिश्रण ब्रेडकरुम्बस सारखे होईल.
  3. त्यामध्ये जिरे, साखर, मीठ, आमचूर पावडर. किंवा लिंबू रस, किसलेला बटाटा घालून मिश्रण एकजीव करून घ्या.लागत असल्यास थोडे थोडे पाणी घालून चांगले आणि घट्ट पीठ मळून घ्या.२०-३० मिनिटासाठी झाकून ठेवून द्या.
  4. नंतर हातानं तेल लावून पीठाचे गोळे बनवून घ्या.
  5. पोळपाटावर प्लास्टिक किंवा मलमलच्या कापडयाला पाणी लावून छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
  6. एका कढई मध्ये मध्यम कमी आचेवर तेल गरम करून त्यात बनवलेल्या पुऱ्या व्यवस्तीत दोन्ही बाजूने लालसर होई पर्यंत टाळून घ्या. तेल जास्त गरम करू नका.
  7. ताज्या खोबऱ्याचा चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर