मुख्यपृष्ठ / पाककृती / फराळी समोसा

Photo of Pharali Samosa by Sujata Hande-Parab at BetterButter
707
5
0.0(0)
0

फराळी समोसा

Aug-08-2018
Sujata Hande-Parab
25 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फराळी समोसा कृती बद्दल

फराळी सामोसा हि माझी इनोवेटिव्ह रेसिपी आहे. सामोसे हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आणि खूप आवडीने तो सगळीकडे खाल्ला जातो. दिल्ली, पंजाब, गुजरात, मुंबई मधले सर्वात आवडते स्ट्रीट फूड म्हणून सामोसा प्रचलित आहे. सामोसा विविध प्रकारे बनविता येतो. चोकोलेट सामोसा, पट्टी सामोसा(कांड्यांपासून बनविला जाणारा), पोहे सामोसा असे विविध प्रकार पाहायला आणि खायला मिळतात. फराळी सामोसा हा तिखट आणि गरमागरम खाल्ला तर खूपच चविष्ट लागतो. सामोसा बनविताना राजगिरा पीठ तेलात व्यवस्तिथ मिक्स करून नंतरच त्यात बाकीचे साहित्य मिक्स करावे. पाणी हवे असेल तरच वापरावे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. समोसा आवरणासाठी • अमरिंथ किंवा राजगिरा पीठ – १ कप •
  2. बटाटा उकडलेला आणि किसलेला - १ मध्यम
  3. मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
  4. साखर - १/२ टीस्पून
  5. आमचूर पावडर – ¼ टीस्पून किंवा लिंबू रस - १ टीस्पून
  6. जिरा - ¼ टीस्पून
  7. तेल - १ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + २ कप फ्रयिंग
  8. पाणी पीठ मळण्यासाठी - १/४ कप किंवा गरजेनुसार
  9. सारणासाठी - बटाटा उकडलेला आणि छोट्या तुकड्यात कापलेला - २ मध्यम.
  10. हिरवी मिरची जाड वाटलेली - १ १/२ टेबलस्पून •
  11. जिरा -१ टीस्पून
  12. भाजलेले शेंगदाणे भरडलेले - ३ टेबलस्पून
  13. काजू भरडलेले - 1 टेबलस्पून
  14. मनुका – १ टीस्पून
  15. किसलेला ताजा नारळ - १/४ कप
  16. लिंबू रस - १ टीस्पून
  17. ताजा आले पेस्ट - २ टीस्पून
  18. मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
  19. तेल - १ टेबलस्पून 
  20. सर्विंग साठी - फ्रेश खोबरे चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी

सूचना

  1. सारणासाठी - पॅन मध्ये तेल गरम करा. जिरे टाकून चांगले तडतडू द्या.
  2. कमी गॅसवर, हिरवी मिरची आणि आले पेस्ट टाकून चांगले भाजून घ्या.
  3. नंतर बारीक तुकडे केलेले बटाटे टाकून चांगले परतून घ्या.
  4. भाजून भरडलेले शेंगदाणे, लिंबाचा रस, मीठ, मनुका, काजू तुकडे घालून एकजीव करून घ्या.
  5. शेवटी किसलेले ताजे खोबरे घालून परतून घ्या.
  6. सामोसा - परातीत किंवा बाउल मध्ये राजगिरा पीठ घ्या.
  7. त्यात तेल घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. मिश्रण ब्रेडकरुम्बस सारखे होईल.
  8. त्यामध्ये जिरे, साखर, मीठ, आमचूर पावडर, किसलेला बटाटा घालून मिश्रण एकजीव करून घ्या.लागत असल्यास थोडे थोडे पाणी घालून चांगले आणि घट्ट पीठ मळून घ्या.२०-३० मिनिटासाठी झाकून ठेवून द्या.
  9. नंतर हातानं तेल लावून पीठाचे गोळे बनवून घ्या.
  10. पोळपाटावर प्लास्टिक किंवा मलमलच्या कापडयाला पाणी लावून छोट्या जाड पुऱ्या लाटून घ्या.
  11. पुरीचे अर्धा वर्तुळ कापा. कोण करून सगळ्या बाजू व्यवस्थित जोडून घ्या
  12. केलेले बटाट्याचे सारण कोनात व्यवस्तीत भरून, सगळ्या बाजू एकत्र आणून जोडून घ्या.
  13. अशाप्रकारे सगळे सामोसे बनवून घ्या.
  14. एका कढई मध्ये मध्यम कमी आचेवर तेल गरम करून त्यात बनवलेलले सामोसे व्यवस्तीत सगळ्या बाजूने लालसर आणि कुरकुरीत होई पर्यंत टाळून घ्या. तेल जास्त गरम करू नका.
  15. ताज्या खोबऱ्याचा चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर