मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची बटाटा भाजी

Photo of Pharali Potato Bhaji by Sujata Hande-Parab at BetterButter
382
3
0.0(0)
0

उपवासाची बटाटा भाजी

Aug-08-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची बटाटा भाजी कृती बद्दल

उपवासाची बटाट्याची भाजी हि सगळ्यांची आवडती, पटकन तयार होणारी आणि टेस्टी आहे. महाराष्ट्रामधे उपवास म्हटले कि विविध प्रकारचे पदार्थ जसे साबुदाणे खिचडी, वडे, वारीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी किंवा राजगिरा पुरी, बटाट्याची भाजी बनविले जातात. उपवास आणि त्यासाठी बनविले जाणारे पदार्थ हे एक प्रमुख कार्य असते आणि ते पदार्थ सगळ्यांनी मिळून खाणे ह्यात देखील एक प्रकारची मजा असते. खाली दिलेली रेसिपी हि परंपरागत रेसिपी आहे आणि ती मी माझ्या आजी कडून शिकून घेतलेली आहे. महाराष्ट्र, गुजरात ह्या ठिकाणी हि भाजी वेगवेगळया पद्धतीने बनविली जाते. हि भाजी वापरून उपवासाचे वडे, सामोसे, किंवा डोसे देखील बनविता येतात. थोडकेच साहित्य असले तरी हि भाजी उपवासाच्या सगळ्या पदार्थामध्ये आपले एक वेगळे स्थान राखून आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे (उकडलेले ,सालेकडून छोट्या तुकड्यात कापलेले ) – २ मध्यम 
  2. जिरे - १टीस्पून 
  3. भाजलेले शेंगदाणे भरड काडून घेतलेले - ३टेबलस्पून 
  4. हिरव्या मिरच्याची जाड पेस्ट - १-२ टेबलस्पून 
  5. काजू तुकडे केलेले - १ टेबलस्पून
  6. किसलेले ओले खोबरे - १/४ कप
  7. मनुका - १ टीस्पून
  8. लिंबाचा रस - १टीस्पून
  9. ताजी आल्याची पेस्ट - २ टीस्पून
  10. मीठ - चवीनुसार  
  11. तेल - १ टेबलस्पून

सूचना

  1. एका नॉनस्टिक कढई मध्ये तेल गरम करून घ्या. जिरे घाला आणि तडतडू द्या.
  2. आता हिरव्या मिरच्यांची पेस्ट, आल्याची पेस्ट घालून चांगले परतून घ्या.
  3. उकडून कापलेले बटाटे, भाजलेले शेंगदाणे भरड, काजूचे तुकडे, मनुका, मीठ, ताजे किसलेले खोबरे आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  4. गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर