साबुदाणा खिचडी | Sabudana Khichdi Recipe in Marathi

प्रेषक Manisha Khatavkar  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana Khichdi recipe in Marathi,साबुदाणा खिचडी, Manisha Khatavkar
साबुदाणा खिचडीby Manisha Khatavkar
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

साबुदाणा खिचडी recipe

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana Khichdi Recipe in Marathi )

 • दोन एक वाटी साबुदाणा
 • पाव वाटी दाण्याचा कूट
 • दोन ते तीन हिरव्या मिरच्या
 • पाव चमचा मीठ
 • अर्धा चमचा साखर
 • अर्धा चमचा जिरे
 • दोन चमचे तूप किंवा रिफाइंड ऑइल
 • थोडे ओले खोबरे चिरलेली कोथिंबीर

साबुदाणा खिचडी | How to make Sabudana Khichdi Recipe in Marathi

 1. खिचडी करण्याआधी सुमारे चार-पाच तास साबुदाणा भिजवून ठेवावा म्हणजे चांगला फुलतो
 2. खिचडी करण्याच्या वेळेस भिजलेला साबुदाणा ताटात मोकळा करून घ्यावा
 3. कढईत तूप जिरे घालून फोडणी करावी मिरच्यांचे तुकडे घालावे साबुदाणा टाकून उलथन्याने परतवावा
 4. नंतर लगेच त्यात दाण्याचे कूट मीठ साखर घालून परत खिचडी हलवावी मध्यम गॅसवर दहा मिनिटे ठेवावे मधून मधून हलवावे म्हणजे खाली लागणार नाही
 5. नंतर गॅस मंद करून झाकण ठेवावे एक वाफ आली की गॅस बंद करावा
 6. झाकण काढावे वरून अर्धे लिंबू पिळावे व हलवावे
 7. डिशमध्ये देताना खिचडीवर थोडे ओले खोबरे चिरलेली कोथिंबीर घालावी

My Tip:

साबूदाणा थोडा गरम करून मग गार करून भिजवला तर खिचडी हलकी व मोकळी होते.

Reviews for Sabudana Khichdi Recipe in Marathi (0)