मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडी

Photo of Sabudana Khichdi by Manisha Khatavkar at BetterButter
1244
1
0.0(0)
0

साबुदाणा खिचडी

Aug-09-2018
Manisha Khatavkar
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खिचडी कृती बद्दल

प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी’ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत.साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ठ लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित.आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत.तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन एक वाटी साबुदाणा
  2. पाव वाटी दाण्याचा कूट
  3. दोन ते तीन हिरव्या मिरच्या
  4. पाव चमचा मीठ
  5. अर्धा चमचा साखर
  6. अर्धा चमचा जिरे
  7. दोन चमचे तूप किंवा रिफाइंड ऑइल
  8. थोडे ओले खोबरे चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. खिचडी करण्याआधी सुमारे चार-पाच तास साबुदाणा भिजवून ठेवावा म्हणजे चांगला फुलतो
  2. खिचडी करण्याच्या वेळेस भिजलेला साबुदाणा ताटात मोकळा करून घ्यावा
  3. कढईत तूप जिरे घालून फोडणी करावी मिरच्यांचे तुकडे घालावे साबुदाणा टाकून उलथन्याने परतवावा
  4. नंतर लगेच त्यात दाण्याचे कूट मीठ साखर घालून परत खिचडी हलवावी मध्यम गॅसवर दहा मिनिटे ठेवावे मधून मधून हलवावे म्हणजे खाली लागणार नाही
  5. नंतर गॅस मंद करून झाकण ठेवावे एक वाफ आली की गॅस बंद करावा
  6. झाकण काढावे वरून अर्धे लिंबू पिळावे व हलवावे
  7. डिशमध्ये देताना खिचडीवर थोडे ओले खोबरे चिरलेली कोथिंबीर घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर