BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाडा पिठाचे थालीपीठ

Photo of Water Chestnut flour Thalipeeth by Sujata Hande-Parab at BetterButter
1801
4
0(0)
0

शिंगाडा पिठाचे थालीपीठ

Aug-10-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाडा पिठाचे थालीपीठ कृती बद्दल

शिंगाडा थालीपिठ बनवण्यास अतिशय सोपे आणि खाण्यास तितकेच स्वादिष्ट लागते. जमिनीच्या खाली वाढणारे हे शिंगाडा वॉटर चेस्ट नट ह्या नावाने देखील प्रचलित आहे. कार्ब्स, फाइबर, मॅंगेनिज, पोटॅशिअम, कॉपर, व B६, रिबोफ्लॅविन जास्त प्रमाणात आदळते. अतिशय पोषक असून ब्लड प्रेशर , वजन कमी करण्यास, कॅन्सरशी लढा देण्यास मदत करते. उपासाला हे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. पिठाची टेस्ट अतिशय स्वादिष्ट असून वेगवेगळ्या रेसिपीस बनविता येऊ शकतात.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • ब्लेंडींग
 • मेन डिश
 • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

 1. शिंगाडा पीठ – ३/४ - १ कप
 2. बटाटा उकडलेला आणि किसलेला किंवा मॅश केलेला - १ मध्यम किंवा १/२ वाटी 
 3. साखर - १/४ टीस्पून
 4. मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
 5. लिंबाचा रस – १ टीस्पून
 6. किसलेले आले - १ टीस्पून 
 7. हिरवी मिरची - १-२ जाडसर वाटून घेतलेली 
 8. भाजलेला जाडसर वाटलेला जिरा - १/२ टीस्पून
 9. भाजलेले आणि जाडसर भरड केलेले शेंगदाणे - ३-४ टेबलस्पून
 10. तेल - २ टेबलस्पून - शॅलो फ्रयिंग
 11. पाणी पीठ मळण्यासाठी - १/४ थ कप किंवा गरजेनुसार
 12. सर्विंग साठी - फ्रेश खोबरे मिरची चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी

सूचना

 1. सगळ्या सांगितलेल्या वस्तू तेल आणि पाणी सोडून मिक्स करून घ्या. लागत असेल तरच पाणी घाला आणि पीठ मळून घ्या.
 2. थोडा वेळ ५ मिनिटे झाकून ठेवा. पिठाचे सामान आकाराचे गोळे करून घ्या. पीठ हाताला चिकटत असल्यास थोडे तेल लावून घ्यावे.
 3. नॉन स्टिक पॅन गरम करून तेल पसरवून घ्या.
 4. पोळपाटाला प्लास्टिक रॅप किंवा किलिन्ग रॅप लावून घ्या. तेल लावून घेऊन त्यावर थालीपीठ थापून घ्या.
 5. दोन्ही बाजूनी तेल सोडून व्यवस्तिथ भाजून घ्या.
 6. गरमा गरम फ्रेश खोबरे मिरची चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर