रताळ्याची खीर | Sweet Potato Kheer Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Potato Kheer recipe in Marathi,रताळ्याची खीर, Sujata Hande-Parab
रताळ्याची खीरby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

रताळ्याची खीर recipe

रताळ्याची खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Potato Kheer Recipe in Marathi )

 • रताळी - १ कप (धुऊन, सोललेली आणि किसलेले)
 • साखर -१/२ कप (ऍडजस्ट करा)
 • फुल्ल फॅट दूध - २ कप
 • क्रिम - २ टेबलस्पून (ऐच्छिक)
 • जायफळ पावडर - १/२ टीस्पून 
 • वेलची पूड - १ टीस्पून 
 • काजूचे तुकडे - १ टेबलस्पून
 • बदाम - १ टेबलस्पून (सोललेली आणि बारीक कापून घेतलेली)
 • मनुका - ७-८
 • तूप - २ टेबलस्पून

रताळ्याची खीर | How to make Sweet Potato Kheer Recipe in Marathi

 1. नॉनस्टीक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले रताळे घालावे.२-३ मिनिटे चांगले मंद आचेवर परतून घ्यावे.
 2. साखर घाला. ढवळून साखर वितळू द्या.
 3. ३/४ भाग दूध घालून मिश्रण उकळी येऊ द्या. थोडे घट्ट होऊ द्या.
 4. काजूचे तुकडे आणि बदाम तुकडे, जायफळ आणि वेलची पावडर घालावी. ढवळत राहा.
 5. राहिलेले दूध आणि मलई किंवा क्रीम घालावी. हळुवारपणे ढवळून घ्यावे. १ मिनीटे शिजवा. जास्त शिजवू नये.
 6. गरम सर्व्ह करावे.

Reviews for Sweet Potato Kheer Recipe in Marathi (0)