मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याची खीर

Photo of Sweet Potato Kheer by Sujata Hande-Parab at BetterButter
1136
3
0.0(0)
0

रताळ्याची खीर

Aug-10-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याची खीर कृती बद्दल

रताळे आणि दुधाचा वापर करून साध्या, स्वादिष्ट अशी खीर तयार केलेली आहे. क्रीम किंवा मलाई टाकल्याने खीर अतिशय रिच लागते. तथापि, हे वैकल्पिक आहे. उपवास व्यतिरिक्त डेसर्ट म्हणून देखील हि खीर बनवली जाऊ शकते. रताळी हि भारतात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची आणि कलर ची आढळतात. उपासाला फार मोठ्या प्रमाणावर ह्यांचा वापर होतो. अतिशय हेलथी, पटकन शिजणारा आणि पोटभरीला असल्याने अतिशय लोकप्रिय आहेत. रताळ्यामधे कर्बोदक, फायबर, बीटा-कॅरोटीन (एक प्रोव्हिटॅमिन ए कॅरोटीनॉइड) अतिशय मोठ्या प्रमाणावर आढळतात. व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 6 आणि मॅगनीजसह अन्य मायक्रोन्युट्रिएन्ट्सची मध्यम प्रमाणावर असतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रताळी - १ कप (धुऊन, सोललेली आणि किसलेले)
  2. साखर -१/२ कप (ऍडजस्ट करा)
  3. फुल्ल फॅट दूध - २ कप
  4. क्रिम - २ टेबलस्पून (ऐच्छिक)
  5. जायफळ पावडर - १/२ टीस्पून 
  6. वेलची पूड - १ टीस्पून 
  7. काजूचे तुकडे - १ टेबलस्पून
  8. बदाम - १ टेबलस्पून (सोललेली आणि बारीक कापून घेतलेली)
  9. मनुका - ७-८
  10. तूप - २ टेबलस्पून

सूचना

  1. नॉनस्टीक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले रताळे घालावे.२-३ मिनिटे चांगले मंद आचेवर परतून घ्यावे.
  2. साखर घाला. ढवळून साखर वितळू द्या.
  3. ३/४ भाग दूध घालून मिश्रण उकळी येऊ द्या. थोडे घट्ट होऊ द्या.
  4. काजूचे तुकडे आणि बदाम तुकडे, जायफळ आणि वेलची पावडर घालावी. ढवळत राहा.
  5. राहिलेले दूध आणि मलई किंवा क्रीम घालावी. हळुवारपणे ढवळून घ्यावे. १ मिनीटे शिजवा. जास्त शिजवू नये.
  6. गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर