शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा | shigadyacha pithacha dhokla Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • shigadyacha pithacha dhokla recipe in Marathi,शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा, Seema jambhule
शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळाby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  1

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  17

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा recipe

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make shigadyacha pithacha dhokla Recipe in Marathi )

 • २ वाट्या शिंगाड्याचे पीठ
 • 1 वाटी दही किंवा आंबटसर ताक
 • हिरवी मिर्ची 2
 • जिरे 1/2 चमचा
 • जीरा पावडर पाव चमचा
 • हिरवी मिर्ची व अद्र्क पेस्ट पाव चमचा (आवशकतेनुसार)
 • मीठ चवीनुसार
 • तेल 1 चमचा
 • साखर पाव चमचा
 • कडिपत्ता 5-6 पान
 • बेकिंग सोडा पाव चमचा

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा | How to make shigadyacha pithacha dhokla Recipe in Marathi

 1. शिंगाड्याच्या पिठात दही किंवा ताक घालून एकजीव करून भिजवत ठेवावे.,
 2. 1 1/2 पीठ भिजत ठेवा
 3. आता 1 1/2 तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या जिरे पावडर व आले, साखर टाकून मिक्स करा
 4. आता ढोकळा ज्या भांडत steama कारचा त्यात पाणी टाकून गरम करा
 5. नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून घ्या
 6. आता ढोकळा पिठात सोडा व थोड तेल टाकून एकच दिशेने मिश्रण हलके होत पर्यंत फेटून घ्या
 7. आता हे मिश्रण तेल लावलेला चपट्या डब्यात टाका
 8. स्टेमर मध्ये ठेवून 15-20 मिनट वाफून घ्या
 9. ढोकळा शिजला कि चाकूने चेक करा
 10. एका भांड्यात तेल टाकून त्यात जिरे मिर्ची व कडीपत्ता साखर आणि थोड मीठ टाकून फोडणी द्या
 11. ती फोडणी ढोकळा वर टाकून पसरून घ्या व त्याचे वाड्या कापून घ्या
 12. वरून ओला नारळचा किस टाकून खा...

Reviews for shigadyacha pithacha dhokla Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo