वरी तांदळाचा किंवा भगरचा डोसा | Barnyard Millet (Bhagar) Crepe or Dosa Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Barnyard Millet (Bhagar) Crepe or Dosa recipe in Marathi,वरी तांदळाचा किंवा भगरचा डोसा, Sujata Hande-Parab
वरी तांदळाचा किंवा भगरचा डोसाby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  6

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

वरी तांदळाचा किंवा भगरचा डोसा recipe

वरी तांदळाचा किंवा भगरचा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Barnyard Millet (Bhagar) Crepe or Dosa Recipe in Marathi )

 • वरीचे तांदूळ किंवा भगर - २ वाटी
 • पाणी - भिजवण्यासाठी 2 वाटी + १/२ – 3/4 वाटी मिश्रण बनवण्यासाठी 
 • तेल - ३-४ टेबलस्पून + १ टेबलस्पून मिश्रणात घालण्यासाठी
 • स्वादानुसार मीठ 

वरी तांदळाचा किंवा भगरचा डोसा | How to make Barnyard Millet (Bhagar) Crepe or Dosa Recipe in Marathi

 1. भगर ४-५ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाणी कडून टाकून मिक्सर ला बारीक वाटून घ्या.
 2. एका वाडग्यात काढून त्यात मीठ, थोडेसे तेल आणि पाणी घालून मिश्रण ढवळून घ्या. मिश्रण फार जाड किंवा अतिशय पातळ असू नये.
 3. नॉनस्टीक पॅन वर तेल पसरवून घ्यावे. एका गोल चमच्याने बनवलेले वरी तांदूळ मिश्रण व्यवस्तिथ गोलाकार रितीने पॅनवर पसरवून घ्या.
 4. 4-5 सेकंद पॅनवर ताट ठेवावे. प्लेट काढून घ्या आणि डोसे पॅनच्या कडा सोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
 5. नारळाच्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

Reviews for Barnyard Millet (Bhagar) Crepe or Dosa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo