मुख्यपृष्ठ / पाककृती / वरी तांदळाचा किंवा भगरचा डोसा

Photo of Barnyard Millet (Bhagar) Crepe or Dosa by Sujata Hande-Parab at BetterButter
1291
4
0.0(0)
0

वरी तांदळाचा किंवा भगरचा डोसा

Aug-10-2018
Sujata Hande-Parab
370 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरी तांदळाचा किंवा भगरचा डोसा कृती बद्दल

वरीचे तांदूळ किंवा भगर हे उपवासाला मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. काही ठिकाणी व काही ठराविक उपासाच्या दिवसांना हे वर्ज्य मानले जातात. महाराष्ट्रामध्ये हे बहुतेक ठिकाणी श्रावण किंवा नवरात्री मध्ये, किंवा रोजच्या उपवासाच्या दिवशी विविध प्रकारच्या रेसिपी बनवून खाल्ले जातात. फराळी डोसा हा बटाटयाच्या भाजी बरोबर किंवा ओल्या खोबऱ्याचा चटनी बरोबर अतिशय उत्तम लागतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. वरीचे तांदूळ किंवा भगर - २ वाटी
  2. पाणी - भिजवण्यासाठी 2 वाटी + १/२ – 3/4 वाटी मिश्रण बनवण्यासाठी 
  3. तेल - ३-४ टेबलस्पून + १ टेबलस्पून मिश्रणात घालण्यासाठी
  4. स्वादानुसार मीठ 

सूचना

  1. भगर ४-५ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाणी कडून टाकून मिक्सर ला बारीक वाटून घ्या.
  2. एका वाडग्यात काढून त्यात मीठ, थोडेसे तेल आणि पाणी घालून मिश्रण ढवळून घ्या. मिश्रण फार जाड किंवा अतिशय पातळ असू नये.
  3. नॉनस्टीक पॅन वर तेल पसरवून घ्यावे. एका गोल चमच्याने बनवलेले वरी तांदूळ मिश्रण व्यवस्तिथ गोलाकार रितीने पॅनवर पसरवून घ्या.
  4. 4-5 सेकंद पॅनवर ताट ठेवावे. प्लेट काढून घ्या आणि डोसे पॅनच्या कडा सोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
  5. नारळाच्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर