फराळी हिरव्या मिरचीचा ठेचा | Pharali Green Chili Techa Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pharali Green Chili Techa recipe in Marathi,फराळी हिरव्या मिरचीचा ठेचा, Sujata Hande-Parab
फराळी हिरव्या मिरचीचा ठेचाby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

फराळी हिरव्या मिरचीचा ठेचा recipe

फराळी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pharali Green Chili Techa Recipe in Marathi )

 • ताज्या हिरव्या मिरच्या - ५-६ मध्यम तिखट
 • जिरे - १ टीस्पून 
 • ताजे किसलेले किंवा पातळ काप केलेले खोबरे - २-३ टेबलस्पून 
 • ताजे किसलेले आले - १ टीस्पून 
 • भाजलेले शेंगदाणे – २ १/२ टेबलस्पून
 • लिंबाचा रस - १/२ टीस्पून 
 • मीठ सैंधव किंवा साधे - चवीनुसार 

फराळी हिरव्या मिरचीचा ठेचा | How to make Pharali Green Chili Techa Recipe in Marathi

 1. एका कढईत किंवा टोपात तेल मिरच्या चांगल्या भाजून घ्याव्यात. त्यावर थोडे थोडे काळे टिपके आले कि समजावे त्या भाजल्या आहेत. जास्त काळ्या करू नयेत.
 2. त्यात खोबरे टाकून १/२ मिनिट भाजून घ्यावे त्यात जिरे, आले टाकावे परतून घ्यावे.
 3. मिक्सरला थोडे जाडसर वाटले कि त्यात भाजलेले शेंगदाणे, मीठ टाकावे आणि एकदा फिरवून घ्यावे. आपल्याला एकदम बारीक पेस्ट नको आहे. भरड हवी आहे.
 4. त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करावे.
 5. कोणत्याही फराळी पराठा, पुरी, थालीपीठ बरोबर सर्व्ह करावे.

My Tip:

लिंबाचा रस हिरवा रंग तसाच ठेवण्यास मदत करतो आणि चवही चांगली लागते.

Reviews for Pharali Green Chili Techa Recipe in Marathi (0)