उपवासाचे पातोळे | upwasache patole Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • upwasache patole recipe in Marathi,उपवासाचे पातोळे, Seema jambhule
उपवासाचे पातोळेby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

उपवासाचे पातोळे recipe

उपवासाचे पातोळे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make upwasache patole Recipe in Marathi )

 • सारणासाठी 
 • ताजा खवलेला नारळ 1 1/2 कप 
 • चिरलेला गूळ 1/2 कप
 • वेलची पूड पाव चमचा 
 • बदामाची कप
 • तूप 1 चमचा
 • आवरणासाठी 
 • शिंगाड्याचे पीठ 1 कप
 • उपवासाचे मीठ चवीनुसार
 • तूप 1/2 चमचा
 • केळीचे पान

उपवासाचे पातोळे | How to make upwasache patole Recipe in Marathi

 1. सारणासाठी खवलेला नारळ आणि गूळ तूपावर परतुन मंद आचेवर शिजवून घ्या. मिश्रण घट्ट होत आलं की मीठ आणि वेलची पूड व बदामाचे काप घालून मिक्स करा आणि ताटलीत काढून मिश्रण गार करा. 
 2. आवरणासाठी एक कप शिंगाड्याचे पीठ घ्या
 3. एक कप पाणी उकळा त्यात अर्धा चमचा तूप आणि मीठ घाला.
 4. पाणी उखळले कि त्यात शिंगाड्याचे पीठ घालून ढवळा
 5. व त्यावर झाकण 10 मिनट ठेवा व गॅस बंद करा
 6. आता पीठ परातीत कडून घ्या व छान मळून घ्या
 7. भाकरीच्या पिठासारखा छोटा गोळा बनवा.व धून व तेल लावलेला केळी चा पानावर ठेवा  
 8. तो छोटा गोळी घेऊन केळीच्या पानावर पातळ थापा. पानाची शीर मधे आली पाहिजे. दोन्ही बाजूला एक सारखं पीठ लागलं पाहिजे. 
 9. आता थापलेल्या पिठावर शीरेच्या एका बाजूला सारण पसरवा.
 10. पानाच्या शीरेवर पानाची घडी घाला म्हणजे सारणाच्या दोन्ही बाजूला पिठाचं आवरण येईल . कडा हलक्या हातानं दाबून बंद करा. 
 11. मोदक पात्रात पाणी गरम करून त्यातल्या जाळीवर ही पाने लावा. झाकण बंद करून १५ मिनिटं वाफवून घ्या.
 12. गरमागरम पातोळे साजूक तुपाबरोबर खायला द्या.  

Reviews for upwasache patole Recipe in Marathi (0)