उपासाचा उपमा | Upasacha Upama Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upasacha Upama recipe in Marathi,उपासाचा उपमा, Archana Lokhande
उपासाचा उपमाby Archana Lokhande
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

उपासाचा उपमा recipe

उपासाचा उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upasacha Upama Recipe in Marathi )

 • भगर वरई १ वाटी
 • साजूक तूप २ चमचे
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • १ बटाटा
 • १ छोटी काकडी
 • १/४ चमचा जिरे
 • मीठ
 • किंचित साखर
 • ओले खोवलेले खोबर १/२ वाटी
 • कोथिंबिर
 • शेंगदाण्याचा कुट ३-४ चमचे
 • २ चमचे लिंबाचा रस
 • सजावटीसाठी शेव

उपासाचा उपमा | How to make Upasacha Upama Recipe in Marathi

 1. मिरची, बटाटा,काकडी आणि कोथिंबीर कापून घेतली.
 2. नंतर भगर घेऊन ती कढईत बारीक गँस ठेऊन छान भाजून घेतली आणि दुसर्या भांडयात काढून घेतली.
 3. आता त्याच कढईत २ चमचे साजूक तुप घेऊन त्यात थोडे जिरे, मिरचीचे तुकडे, बटाटा आणि काकडीचे तुकडे घालून थोडे परतून घेतले आणि २-३ वाटी पाणी आतले.
 4. पाणी उकळायला लागल्यावर त्यात मीठ, ओल्या खोबर्याचा किस, शेंगदाणा कुट, थोडा लिंबाचा रस आणि किंचित साखर घालून हालवून घेतले.
 5. नंतर भाजलेली भगर घालून परतावे (लागल्यास थोडे पाणी घालावे).
 6. ५ मिनीटांनी भगर शिजली की वरून खोबरे, कोथिंबिरी आणि उपवासाची शेव घालून गरमा गरम सर्व्ह करावे.

Reviews for Upasacha Upama Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo