उपवास काकडीचे थालीपीठ | Fasting cucumber pancakes Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fasting cucumber pancakes recipe in Marathi,उपवास काकडीचे थालीपीठ, Teju Auti
उपवास काकडीचे थालीपीठby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

उपवास काकडीचे थालीपीठ recipe

उपवास काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fasting cucumber pancakes Recipe in Marathi )

 • १ कप काकडीचा किस
 • १/४ कप दाण्याचा कूट
 • २ ते ३ हिरव्या मिरच्यांचा ठेचा
 • १/४ कप चिरलेली कोथिंबीर
 • दिड कप उपासाची भाजणी
 • मिठ , तूप

उपवास काकडीचे थालीपीठ | How to make Fasting cucumber pancakes Recipe in Marathi

 1. काकडी सोलून किसावी. काकडीच्या किसात थोडे मिठ टाकावे. नंतर दाण्याचा कूट, मिरचीचा ठेचा, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
 2. काकडीच्या मिश्रणात भिजेल इतकी उपासाची भाजणी घालावी. व्यवस्थित गोळा मळून घ्यावा.
 3. तव्याला तूपाचा हात लावावा. तयार गोळ्याचे २ ते ३ समान भाग करावे. त्यातील १ भाग घेऊन तव्यावर थापावा. झाकण ठेवून थोडावेळ शिजू द्यावे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी थालिपीठ खरपूस होवू द्यावे. थालिपीठ भाजताना कडेने थोडे तूप सोडावे.
 4. दही बरोबर काकडीचे थालिपीठ दयावे

My Tip:

किसल्यावर त्यातील पाणी काढून टाकू नये.

Reviews for Fasting cucumber pancakes Recipe in Marathi (0)