गुलकंद रोल | Gulkand Roll Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  12th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gulkand Roll recipe in Marathi,गुलकंद रोल, Archana Lokhande
गुलकंद रोलby Archana Lokhande
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

गुलकंद रोल recipe

गुलकंद रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gulkand Roll Recipe in Marathi )

 • शेंगदाणे १ मोठी वाटी
 • साखर १ छोटी वाटी
 • साजूक तूप २ चमचे
 • गुलकंद १/२ कप
 • ३-४ चमचे खोबरं किस
 • २-३ वियालची
 • पाणी

गुलकंद रोल | How to make Gulkand Roll Recipe in Marathi

 1. प्रथम शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली.
 2. सोललेले शेंगदाणे मिक्सरवर बारीक वाटून पावडर करून घेतली.
 3. गुलकंद, खोबरं किस,विलायची सर्व एकत्र घेऊन छान मिक्स करून घेतले.
 4. आता गँसवर एका पँनमध्ये एक वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी घालून साखर विरघळून घेतली.
 5. २ चमचे तूप घालून एक उकळी आल्यावर त्यात शेंगदाण्याची पावडर घालून २-३ मिनिटे वाफलून घेतले.(पण सारखे हालवत राहिले).
 6. मिश्रण जेव्हा भांडे सोडू लागेल तेव्हा गँस बंद केली.
 7. आता एका प्लास्टिक पेपर किंवा बटर पेपरला तूप लावून घेतले.
 8. तयार मिश्रण त्यावर ओतून दुसरा पेपर वरून ठेवून लाटण्याने लाटून घेतला.
 9. नंतर त्यावर वरून गुलकंदाचे मिश्रण घालून सर्वत्र पसरवून घेतले आणि त्याच्या उभ्या पट्या कापून घेतल्या.
 10. आता कापलेल्या पट्टीचा एक एक रोल केला आणि वरून खोबरं किस भुरभुरून सर्व्ह केले गुलकंद रोल.

My Tip:

काही नाही

Reviews for Gulkand Roll Recipe in Marathi (0)