Photo of Pharali Sweet Bites by Sujata Hande-Parab at BetterButter
813
4
0.0(1)
0

Pharali Sweet Bites

Aug-13-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भाजलेले बदाम - १२-१४
  2. बेदाणा - २ टेबलस्पून 
  3. खजूर (बिया काढलेले ) - ७-८(काळे)
  4. भाजलेले शेंगदाणे - १/४ वाटी(साले काढून घेतलेली)
  5. कंडेन्सड दूध - ३-४ टेबलस्पून 
  6. जायफळ पूड - १/४ टीस्पून 
  7. हिरव्या वेलची पूड - १/२ टीस्पून 
  8. किसलेले पनीर - १/४ वाटी
  9. ताजे खवलेले किंवा किसलेला नारळ - ३/४ वाटी

सूचना

  1. गरम पॅनवर किसलेले खोबरे कमी आचेवर २-३ मिनिटे भाजून घ्यावे.
  2. वेलची, जायफळ पावडर घालावी. मिसळा.
  3. कंडेन्सड दूध घाला.एकत्रित होईपर्यंत मिसळा. एक वाडग्यात किसलेले पनीर आणि किसलेले खोबरे-कंडेन्सड दूध मिश्रण घेऊन चांगले मिक्स करून घ्या घ्या आणि बाजूला ठेवा.
  4. एका ब्लेंडरमध्ये भाजलेले बदाम, शेंगदाणे, मनुका, खजूर वाटून घ्यावे. त्यात वेलचीपूड एक चिमूटभर घालावी. चांगले मिक्स करावे
  5. १ १/२ इंच सुका मेवा मिश्रणाचे गोळे बनवा.
  6. लिंबूच्या आकाराचे नारळ-पनीर मिश्रणाचे गोळे बनवून त्याला थोडे बोटानी थापून घेऊन छोटी वाटी किंवा लाटी बनवून घ्या.
  7. तयार केलेले सुका मेवा मिश्रणाचे बॉल्स त्यामध्ये बसवून सगळ्या बाजूनी व्यवस्तिथ गोलाकार करून लाडू सारखा आकार द्या.
  8. उर्वरीत मिश्रणासह प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
  9. ते हवाबंद डब्यात घालून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. १ किंवा २ दिवस चांगले राहतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Teju Auti
Aug-18-2018
Teju Auti   Aug-18-2018

Prsentation all receipes good and delicious..

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर