मुख्यपृष्ठ / पाककृती / दही - वरी जिरा भात

Photo of Curd -Barnyard Millet (Bhagar) Jira Rice by Sujata Hande-Parab at BetterButter
1161
3
0.0(0)
0

दही - वरी जिरा भात

Aug-13-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही - वरी जिरा भात कृती बद्दल

वरी च्या तांदळापासून वरी जिरा भात बनवलेला आहे. तो तडका दिलेल्या दह्याबरोबर अतिशय स्वादिष्ट लागतो..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वरी जिरा भात - भगर किंवा वरीचा तांदूळ - ३/४ कप
  2. तूप - १/२ टेबलस्पून 
  3. सैंधव मीठ - चवीनुसार 
  4. हिरवी मिरची - १/२ टेबaलस्पून - बारीक तुकडे केलेली 
  5. जिरे - १ टीस्पून 
  6. पाणी - १ - १ १/२ कप शिजवण्यासाठी  
  7. तडका दही साठी -  दही - १ कप
  8. जिरे - १/४ टीस्पून
  9. हिरवी मिरची - १ टीस्पून
  10. आले - १ टीस्पून किसलेले 
  11. सैंधव मीठ चवीनुसार 
  12. तेल - १/२ - १ टीस्पून

सूचना

  1. वरीचा तांदूळ चांगला धुवून चाळणीने पाणी काढून टाका.
  2. एका टोपात किंवा पॅन मध्ये तूप टाकून त्यात जिरे टाकून तडतडू द्या.
  3. मिरची टाकून २-३ सेकंड ढवळून घ्या. धुऊन घेतलेला वरीचा तांदूळ आणि मीठ घालून ढवळ.
  4. पाणी टाकून तो ४-५ मिनिटे माधयम आचेवर शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळत राहा.
  5. थोडा सुकल्यानंतर आणि भात नरम झाल्यावर गॅस बंद करून टाका.
  6. टोपावर झाकण ठेवून २-३ मिनिटे तसेच राहू द्या. झाकण काढून थोडावेळ तसेच राहू द्या.
  7. फोडणीच्या दह्यासाठी - एका वाडग्यात दही आणि मीठ चांगले फेटून घ्या.
  8. एका पॅन मध्ये तेल टाकून त्यात जिरे टाकून तडतडू द्या.
  9. त्यात बारीक कापून घेतलेली मिरची आणि किसलेले आले टाकून थोडे परतून घ्या.
  10. केलेला तडका दह्यावर ओता.
  11. गरमा गरम जिरा वरी भाताबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर