BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टॅफड भगर (वरी भात) कटलेट्स

Photo of Stuffed Barnyard Millet Cutlets by Sujata Hande-Parab at BetterButter
0
4
0(0)
0

स्टॅफड भगर (वरी भात) कटलेट्स

Aug-13-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टॅफड भगर (वरी भात) कटलेट्स कृती बद्दल

वरी भात कटलेट्स हि एक इंनोवाटीव्ह रेसिपी आहे. उपासाला वरीचा भात खाल्ला जातो. काही वेळा खाऊन खाऊन खूप कंटाळा हि येतो असा वेळेला वेगळे काही तरी म्हणून हे कटलेट्स अतिशय स्वादिष्ट लागतात. बाहेरून कुरकुरीत भाताची लेअर आणि आत तिखट बटाट्याचे सारण हे कॉम्बीनेशन फारच टेस्टी लागते. कटलेट्स मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावेत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • रोस्टिंग
 • ब्लेंडींग
 • स्टीमिंग
 • मेन डिश
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

 1. जिरा वरी भात- १ कप
 2. बटाटा उकडलेला आणि किसलेला - ३/४ कप 
 3. मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
 4. साखर - १/२ टीस्पून
 5. लिंबू रस - १/२ टीस्पून
 6. फोडणीसाठी - जिरे - १/४ टीस्पून अगदी थोडे 
 7. हिरवी मिरची जाडसर वाटलेली - १ किंवा २ टेबलस्पून
 8. किसलेले ताजे आले - १ टेबलस्पून (जाडसर वाटून घेणे)
 9. जिरा पूड - १/२ टीस्पून 
 10. तेल/तूप - ३-४ टेबलस्पून फ्रयिंग + १ टीस्पून फोडणीसाठी
 11. सर्विंग साठी - गोड दही ,किंवा खोबरे चटणी
 12. गार्निशिंग - डाळिंबाचे दाणे 

सूचना

 1. एका कढईत किंवा पॅन मध्ये तेल गरम करून घ्या. त्यात जिरे टाकून त्याला तडतडू द्या.
 2. त्यात हिरव्या मिरचीची, आल्याची जाड चटणी किंवा भरड टाकून चांगले कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्या.
 3. त्यात जिरे पूड टाकून ढवळा.
 4. त्यात उकडून कुस्करलेला बटाटा, सैंधव मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
 5. लिंबू रस टाकून चांगले मिक्स करून घ्या. गॅस बंद करा.
 6. कटलेट्स - शिजवलेला वारी भात चांगला कुस्करून त्याचे सामान आकाराचे गोळे बनवा.
 7. त्यांना डिस्क किंवा छोटी लाटी सारखा आकार देऊन त्यात १ १/२ टीस्पून बनवलेले बटाट्याचे सारण घालून सगळ्या बाजूनी व्यवस्तिथ बंद करून घ्या.
 8. पॅन वर तेल टाकून व्यवस्तिथ पसरून घ्या.
 9. छोटे गोल कटलेट्स करून पॅन वर दोनी बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
 10. गरम गरम गोड दह्याबरोबर सर्वे करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर