आले गूळ चहा | Ginger Jaggery Tea Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ginger Jaggery Tea recipe in Marathi,आले गूळ चहा, Sujata Hande-Parab
आले गूळ चहाby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

आले गूळ चहा recipe

आले गूळ चहा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ginger Jaggery Tea Recipe in Marathi )

 • ताजे आले - १/२ इंच - जाडसर वाटून घेतलेले किंवा पातळ काप करून घेतलेले
 • किसलेला गूळ - २ टेबलस्पून (आपल्या चवीनुसार कमी जास्त करावा)
 • चहा पावडर - २ टीस्पून 
 • दूध - १/२ - ३/४ कप
 • पाणी - २ कप

आले गूळ चहा | How to make Ginger Jaggery Tea Recipe in Marathi

 1. ताजे आले धुऊन थोडे ठेचून घ्यावे किंवा पातळ काप करून घ्यावे.
 2. सौस पॅन मध्ये किंवा चहाच्या किटलीत पाणी गरम करण्यास ठेवावे. उकळी येताच आले घालावे.
 3. कमी माध्यम आचेवर ८-१२ मिनिटांसाठी चांगले उकळी काढून घ्यावे.
 4. मिश्रण १/२ झाले कि त्यात चहा पावडर आणि गूळ घालावा. ५ मिनिटे कमी आचेवर हळू हळू सिमर होऊ द्यावे.
 5. दूध घालावे. थोडा वेळ ठेवून लगेचच गाळणीने गाळून घेऊन सर्व्ह करावे. दूध घातल्यावर उकळी काढू नये.

My Tip:

दूध घातल्यावर उकळी काढू नये. दूध फाटून चहा खराब होण्याची शक्यता असते.

Reviews for Ginger Jaggery Tea Recipe in Marathi (0)