मुख्यपृष्ठ / पाककृती / आले गूळ चहा

Photo of Ginger Jaggery Tea by Sujata Hande-Parab at BetterButter
1027
3
0.0(0)
0

आले गूळ चहा

Aug-13-2018
Sujata Hande-Parab
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आले गूळ चहा कृती बद्दल

लगेचच होणारे आणि आल्याच्या सुगंधाने आणि चवीने भरपूर असे पोषक पेय आहे. रोजच्या साध्या चहा पेक्षा वेगळी आल्याची चहा एक वेगळी तरतरी आणते. महाराष्ट्र मध्ये ह्याचे नियमित सेवन केले जाते. दूध घातल्यावर चहाला उकळी काढू नये नाहीतर चहा फुटण्याची शक्यता असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ताजे आले - १/२ इंच - जाडसर वाटून घेतलेले किंवा पातळ काप करून घेतलेले
  2. किसलेला गूळ - २ टेबलस्पून (आपल्या चवीनुसार कमी जास्त करावा)
  3. चहा पावडर - २ टीस्पून 
  4. दूध - १/२ - ३/४ कप
  5. पाणी - २ कप

सूचना

  1. ताजे आले धुऊन थोडे ठेचून घ्यावे किंवा पातळ काप करून घ्यावे.
  2. सौस पॅन मध्ये किंवा चहाच्या किटलीत पाणी गरम करण्यास ठेवावे. उकळी येताच आले घालावे.
  3. कमी माध्यम आचेवर ८-१२ मिनिटांसाठी चांगले उकळी काढून घ्यावे.
  4. मिश्रण १/२ झाले कि त्यात चहा पावडर आणि गूळ घालावा. ५ मिनिटे कमी आचेवर हळू हळू सिमर होऊ द्यावे.
  5. दूध घालावे. थोडा वेळ ठेवून लगेचच गाळणीने गाळून घेऊन सर्व्ह करावे. दूध घातल्यावर उकळी काढू नये.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर