असोर्टेड रताळ्याचे गोड बॉल्स | Assorted Sweet Potato Balls Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  13th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Assorted Sweet Potato Balls recipe in Marathi,असोर्टेड रताळ्याचे गोड बॉल्स, Sujata Hande-Parab
असोर्टेड रताळ्याचे गोड बॉल्सby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

असोर्टेड रताळ्याचे गोड बॉल्स recipe

असोर्टेड रताळ्याचे गोड बॉल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Assorted Sweet Potato Balls Recipe in Marathi )

 • शिजवलेले आणि मॅश केलेली रताळी - २ वाटी
 • साबुदाणा पीठ - १ - २ टेबलस्पून
 • लिंबाचा रस - १ टीस्पून
 • साखर - १/४ वाटी
 • जिरेपूड - १ टीस्पून
 • ताजे किसलेले खोबरे - १/२ वाटी + ४ टेबलस्पून सारणासाठी 
 • पांढरे तीळ - 1/4 वाटी 
 • खसखस - 2 टीस्पून
 • भाजलेले आणि भरड केलेला सुकामेवा (बदाम, काजू आणि मनुका) - २ टेबलस्पून
 • वेलची पूड - १/२ टीस्पून
 • पिठी साखर किंवा खजूर सिरप - १ टीस्पून
 • तूप किंवा तेल - तळणीसाठी २ कप 
 • स्वादानुसार मीठ किंवा सैंधव मीठ
 • सर्विंगसाठी - गोड दही

असोर्टेड रताळ्याचे गोड बॉल्स | How to make Assorted Sweet Potato Balls Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात कुस्करलेले रताळे घेऊन त्यात सैंधव मीठ, साखर, लिंबू रस, साबुदाणा पीठ, भाजलेली जिरा पूड घालून घट्ट मळून घ्यावे.
 2. १ सारण - एका पॅन मध्ये भाजलेले नसतील तर सफेद तीळ, खसखस, आणि किसलेले खोबरे घालावे. थोडे मंद आचेवर सुकेच भाजून घ्यावे. जास्त भाजू नये. त्यात साखर, जायफळ, वेलची पूड घालून १०-१२ सेकंड ढवळून घ्यावे. गॅस बंद करून थंड होण्यास ठेवावे.
 3. २ सारण - एकदम बारीक केलेले किंवा जाडसर वाटलेले सुका मेवा घ्यावे. पिठी साखर किंवा खजूर सिरप आणि थोडे खोबरे घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
 4. बॉल बनवण्यासाठी - रताळ्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स करून त्याला डिस्क किंवा बशी सारखा आकार देऊन त्यात केलेले पहिले सारण भरून घ्यावे. कडा व्यवस्तिथ बंद करून बॉल गोल करून घ्यावा.
 5. असा प्रकारे दुसरे सारण भरून देखील बॉल्स बनवून घ्यावेत. सगळे बॉल्स टाळण्यासाठी तयार करून ठेवावेत.
 6. एका कढईत तेल गरम करून घ्यावे. आच मंद माध्यम ठेवावी नाहीतर बॉल्स टाकल्यावर लगेचच करपण्याची शक्यता असते.
 7. बॉल्स थोडे थोडे करून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत टाळून घ्यावेत.
 8. गोड दह्या बरोबर गरमा गरम सर्व्ह करावेत.

Reviews for Assorted Sweet Potato Balls Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo