रताळी गुलाबजाम | sweet potato gulabjam Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  14th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • sweet potato gulabjam recipe in Marathi,रताळी गुलाबजाम, Teju Auti
रताळी गुलाबजामby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

रताळी गुलाबजाम recipe

रताळी गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make sweet potato gulabjam Recipe in Marathi )

 • १ रताळे
 • १/४ कप पनीर किसलेले
 • मीठ, तळण्यासाठी तूप
 • १ १/२ टे स्पून साबुदाणा पीठ
 • १/२ कप पाणी
 • १ कप साखर

रताळी गुलाबजाम | How to make sweet potato gulabjam Recipe in Marathi

 1. रताळी उकडून सोलून अगदी मऊ कुस्करावी.
 2. त्यामध्ये किसलेले पनीर व घट्टपणा येण्यासाठी साबुदाणा पीठ व मीठ घालून चांगले मळून घ्या व त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावा.
 3. साखर, पाणी करून पाक करायला ठेवा. पाक फार घट्ट नसावा.
 4. एका कढई मध्ये तूप गरम करून गोळे गुलाबी रंगावर तळून घ्या. मग तळलेले गोळे पाकामध्ये घाला.

My Tip:

गुलाबजाम जर बनवताना पीठ सैल वाटत असल्यास साबुदाणा पीठ टाकावे.

Reviews for sweet potato gulabjam Recipe in Marathi (0)