कच्च्या केळ्याची भाजी | Raw banana bhaji Recipe in Marathi

प्रेषक Manisha Khatavkar  |  14th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Raw banana bhaji recipe in Marathi,कच्च्या केळ्याची भाजी, Manisha Khatavkar
कच्च्या केळ्याची भाजीby Manisha Khatavkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

कच्च्या केळ्याची भाजी recipe

कच्च्या केळ्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raw banana bhaji Recipe in Marathi )

 • दोन कच्ची भाजीची केळी
 • पाव चमचा जिरे
 • दोन ते तीन हिरव्या मिरच्या
 • दोन ते तीन चमचे तेल किंवा तूप
 • चवीपुरते मीठ
 • किसलेले ओले खोबरे
 • थोडी बारीक चिरलेली कोथंबीर
 • चवीपुरती साखर

कच्च्या केळ्याची भाजी | How to make Raw banana bhaji Recipe in Marathi

 1. स्पेशल भाजीची केळी घ्यावीत तिची सालं काढून छोटे आकाराचे तुकडे करून घ्यावेत
 2. प्रथम तेल गरम करून घ्यावे त्यात जिरे व मिरची घालून फोडणी करून घ्यावी
 3. जिरे चांगले तडतडले की त्यात केळ्याचे तुकडे घालावे मीठ साखर घालावी व नीट परतून घ्यावे.
 4. थोडासा पाण्याचा हबका देऊन घट्ट झाकण लावून मंद आचेवर केळी शिजवून घ्यावीत त्यावर किसलेले ओले खोबरे व कोथिंबीर पेरावी
 5. आपली कच्च्या केळ्याची उपवासाची भाजी तयार

Reviews for Raw banana bhaji Recipe in Marathi (0)