शिंगाडा पीठाचा हलवा | Chestnut flour halwa Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  15th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chestnut flour halwa recipe in Marathi,शिंगाडा पीठाचा हलवा, Teju Auti
शिंगाडा पीठाचा हलवाby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

शिंगाडा पीठाचा हलवा recipe

शिंगाडा पीठाचा हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chestnut flour halwa Recipe in Marathi )

 • शिंगाडा पीठ - १ वाटी
 • साखर - पाव वाटी
 • तूप - २ टेबलस्पून
 • दूध - अर्धी वाटी
 • वेलचीपूड, सुकामेवा

शिंगाडा पीठाचा हलवा | How to make Chestnut flour halwa Recipe in Marathi

 1. कढईत तूप गरम करून त्यावर शिंगाड्याचे पीठ परतून घ्यावे.
 2. या परतलेल्या पीठावर थोडे थोडे दूध सोडून सतत परतत राहावे. यामुळे पीठ फुलते.
 3. वरून साखर घालून पुन्हा ढवळावे. साखरेमुळे थोडा ओलसरपणा येईल. झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजू द्यावे.
 4. गॅस बंद करून त्यात वेलची पूड घालून ढवळावे आणि सुका मेवा घालावा. झाकण बंद करून २ मिनिटे तसेच ठेवावे.

My Tip:

पाण्यापेक्षा दूध वापरल्याने चविष्ट लागते . शिंगाड्याचे पीठ पटकन करपते त्यामुळे सारखे ढवळत रहावे.

Reviews for Chestnut flour halwa Recipe in Marathi (0)