मुख्यपृष्ठ / पाककृती / फराळी केळ्याचे घारगे

Photo of Farali banana Gharge by Sujata Hande-Parab at BetterButter
1192
4
0.0(0)
0

फराळी केळ्याचे घारगे

Aug-15-2018
Sujata Hande-Parab
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फराळी केळ्याचे घारगे कृती बद्दल

वरीच्या तांदळाचे पीठ, केळे, आणि गूळ वापरून गोड फराळी घारगे केलेले आहेत. चहा बरोबर अतिशय स्वादिष्ट लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वरी तांदूळ पीठ – 1 कप
  2. पिकलेले केळे –1/2 सोलून मॅश केलेले (सगळे एकदम घालू नये)
  3. मीठ किंवा सैंधव मीठ – १/४ टीस्पून
  4. किसलेला गुळ किंवा साखर – १-२ टेबलस्पून (केळ्याच्या गोडीनुसार कमी जास्त करा)
  5. तेल - १/२ टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + २ कप फ्रयिंग
  6. पाणी पीठ मळण्यासाठी - गरजेनुसार लागत असेल तरच वापरावे. (पर्यायी)
  7. सर्विंग साठी - फ्रेश खोबरे चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी , चहा

सूचना

  1. परातीत किंवा बाउल मध्ये वरी तांदूळ पीठ घ्या.
  2. त्यात तेल घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
  3. त्यामध्ये किसलेला गुळ, मीठ, पिकलेले मॅश केलेले केळे घालून मिश्रण एकजीव करून घ्या. लागत असल्यास थोडे थोडे पाणी घालून चांगले (लागत असेल तरच)आणि घट्ट पीठ मळून घ्या.२०-३० मिनिटासाठी झाकून ठेवून द्या.
  4. नंतर हातानं तेल लावून पीठाचे गोळे बनवून घ्या.
  5. पोळपाटावर प्लास्टिक पेपर ठेवून घारगे लाटून घ्या. जर पीठ चिकट लागत असेल तर पोळपाटाला आणि गोळ्यांना पीठ लावून घारगे लाटून घ्या. किंवा एक मोठी मध्यम जाड पोळी लाटून ३ इंच कटर ने छोटे छोटे घारगे कापून घ्यावेत
  6. एका कढई मध्ये मध्यम कमी आचेवर तेल गरम करून त्यात बनवलेले घारगे व्यवस्तीत दोन्ही बाजूने लालसर होई पर्यंत टाळून घ्या. तेल जास्त गरम करू नका.
  7. ताज्या खोबऱ्याचा चटणी किंवा चहा बरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर