फराळी दही पुरी चाट | Pharali Dahi Puri Chat Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  15th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pharali Dahi Puri Chat recipe in Marathi,फराळी दही पुरी चाट, Sujata Hande-Parab
फराळी दही पुरी चाटby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

फराळी दही पुरी चाट recipe

फराळी दही पुरी चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pharali Dahi Puri Chat Recipe in Marathi )

 • शिंगाडा पीठ – ३/४ - १ कप
 • वरीचे पीठ किंवा बाणयार्ड मिलेट पीठ - १/२ कप
 • वरी तांदूळ - १ टेबलस्पून मिक्सर ला लावून रवाळ वाटून घेतलेले 
 • मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
 • साखर - १/४ टीस्पून
 • जिरा पूड - १ टीस्पून
 • काळीमिरी पूड - १ टीस्पून
 • तूप - १ टेबलस्पून
 • तेल – २ कप - फ्रयिंग
 • पाणी पीठ मळण्यासाठी - १/४ कप किंवा गरजेनुसार
 • पुरी चाट साठी - गोड दही - १ कप(जास्त गोड नको)
 • खोबरे मिरची चटणी - १/४ कप (तिखट)
 • खजूर सिरप - २-३ टेबलस्पून (गोड)
 • फराळी मिरचीचा ठेचा - १-२ टेबलस्पून (पर्यायी)
 • भाजलेली जिरे पूड - १ टीस्पून
 • फराळी बटाटा चिवडा - १/२ कप
 • • सर्विंग साठी - फ्रेश खोबरे मिरची चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी, गोड दही, फराळी, मिरची पातळ काप, बटाटा चिवडा

फराळी दही पुरी चाट | How to make Pharali Dahi Puri Chat Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात सगळ्या सांगितलेल्या वस्तू (पाणी, तेल सोडून)आणि कोमट तूप टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. पीठ ब्रेड क्रम्ब सारखे दिसले पाहिजे.
 2. पाणी हळूहळू घाला आणि पीठ मळून घ्या.
 3. थोडा वेळ 10-15 मिनिटे झाकून ठेवा. कणिक किंवा मळलेले पीठ समान गोळ्यात विभागून घ्या.
 4. प्लास्टिक रॅप किंवा थोडेसे वरीचे पीठ लावून मोठी थोडी माध्यम जाड (जास्त जाड नको) चपाती लाटून घ्या.
 5. २ १/२ - ३ इंच कटर च्या साहाय्याने छोटे छोटे गोल आकारात कापून घ्या. फोर्क च्या मदतीने सगळीकडे टोचून घ्या.
 6. सगळ्या पुऱ्या असा प्रकारे बनवून ठेवा.
 7. एका कढईमधे तेल गरम करून तयार केलेल्या पुऱ्या मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आच मंदच ठेवा.
 8. टिशु पेपर वर काढून घ्या.
 9. एका प्लेट वर व्यवस्तिथ लावून घ्या. त्यावर तयार केलेली खोबरे-मिरची चटणी पसरवून घ्या.
 10. चटणीवर १/४ टीस्पून खजूर सिरप टाका.
 11. त्यावर मिरचीचा ठेचा आणि जिरे पूड स्प्रिंकल करा.
 12. नंतर गोड दही १ १/२ टीस्पून टाका. त्यावर फराळी बटाट्याचा चिवडा पसरवून घ्या.
 13. हिरव्या मिरचीच्या पातळ काप टाकून सर्व्ह करा.

My Tip:

कणिक लाटताना जर जास्त तुटत असेल तर त्यात वरीचे पीठ घालून चांगले मळून घ्यावे.

Reviews for Pharali Dahi Puri Chat Recipe in Marathi (0)