मुख्यपृष्ठ / पाककृती / फराळी ट्रँगल्स

Photo of Pharali Triangles by Sujata Hande-Parab at BetterButter
601
6
0.0(0)
0

फराळी ट्रँगल्स

Aug-15-2018
Sujata Hande-Parab
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फराळी ट्रँगल्स कृती बद्दल

फराळी ट्रँगल्स हि एक इंनोवाटीव्ह रेसिपी आहे.कोणत्याही तिखट हिरव्या चटनी बरोबर किंवा असेच हि स्वादिष्ट लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • एअर फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिंगाडा पीठ – ३/४ - १ कप
  2. वरीचे पीठ किंवा बाणयार्ड मिलेट पीठ - १/२ कप
  3. वरी तांदूळ - १ टेबलस्पून मिक्सर ला लावून रवाळ वाटून घेतलेले 
  4. मीठ किंवा सैंधव मीठ चवीनुसार
  5. साखर - १/४ टीस्पून
  6. जिरा पूड - १ टीस्पून
  7. काळीमिरी पूड - १ टीस्पून
  8. तूप - १ टेबलस्पून
  9. तेल – २ कप - फ्रयिंग  •
  10. पाणी पीठ मळण्यासाठी - १/४ कप किंवा गरजेनुसार 
  11. सर्विंग साठी - फ्रेश खोबरे मिरची चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी, दही

सूचना

  1. एका वाडग्यात सगळ्या सांगितलेल्या वस्तू (पाणी, तेल सोडून)आणि कोमट तूप टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. पीठ ब्रेड क्रम्ब सारखे दिसले पाहिजे. पाणी हळूहळू घाला आणि थोडे घट्ट पीठ मळून घ्या. हवाबंद डब्यात भरून ५-६ दिवस चांगले राहतात
  2. थोडा वेळ 10-15 मिनिटे झाकून ठेवा. कणिक किंवा मळलेले पीठ समान गोळ्यात विभागून घ्या.
  3. प्लास्टिक रॅप किंवा मलमलच्या कपड्याला तेल लावून मोठी थोडी जाडसर(जास्त जाड नको ) चपाती लाटून घ्या. लाटताना लागत असल्यास थोडेसे वरीचे पीठ लावून लाटा.
  4. ३ इंच कटर च्या साहाय्याने छोटे छोटे जाडसर गोल आकारात कापून घ्या. फोर्क च्या मदतीने सगळीकडे टोचून घ्या.
  5. पिझ्झा कटर किंवा सुरीने किंवा शंकरपाळे कटर ने प्रत्येक पुरी पहिल्यांदा चार, नंतर आणखीन २-४ भागात त्रिकोणी कापून घ्या.
  6. एका कढईमधे तेल गरम करून तयार केलेले ट्रँगल्स मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आच मंदच ठेवा नाहीतर ट्रँगल्स करपण्याची शक्यता असते.
  7. टिशु पेपर वर काढून घ्या.
  8. एका प्लेट मध्ये व्यवस्तिथ लावून घ्या. त्यावर मिरचीचा ठेचा, दही आणि खोबरे मिरचीची चटणी स्प्रिंकल करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर