बदाम केक | Alomond cake Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Alomond cake recipe in Marathi,बदाम केक, Teju Auti
बदाम केकby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

बदाम केक recipe

बदाम केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alomond cake Recipe in Marathi )

 • शिंगाड्याचे पीठ २०० ग्रॅम
 • साजूक तूप १०० मिली
 • खजूर
 • पिठी साखर १०० ग्रॅम
 • खायचा सोडा अर्धा टीस्पून
 • वेलची पावडर
 • बेकिंग पावडर एक टीस्पून
 • नेसकॉफी चार पाकिटे
 • दीड वाटी दूध
 • साखर तीन टीस्पून
 • बदाम

बदाम केक | How to make Alomond cake Recipe in Marathi

 1. अर्धी वाटी दूध गरम करावे. खजूराच्या बिया काढून या दुधात भिजत घालावे.
 2. शिंगाड्याचे पीठ, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, सोडा. वेलची पावडर एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे. खजूर दुधासकट मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावा.
 3. ओव्हन १८० डिग्रीवर पाच मिनिटे प्रिहीट करून घ्यावा.
 4. तूप, पिठी साखर, वाटलेला खजूर एकत्र परातीत घेऊन फेसावे. चाळलेले पीठ फेसलेल्या तुपात मिसळून फेसावे. लागेल तसे दूध मिसळावे. मला वाटीभर लागले.
 5. मिश्रणात साधी साखर घालून नीट मिसळावी. यामुळे साखर असलेल्या ठिकाणी साखर विरघळून छान जाळी पडते.
 6. सजावटीसाठी बदामाचे काप घालावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओतावे. १८० डिग्रीवर पस्तीस मिनिटे ठेवावे.दहा मिनिटे गार करावे.

Reviews for Alomond cake Recipe in Marathi (0)