उपवासाची बटाटा जिलेबी | Potato Jalebi Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato Jalebi recipe in Marathi,उपवासाची बटाटा जिलेबी, Bharti Kharote
उपवासाची बटाटा जिलेबीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

उपवासाची बटाटा जिलेबी recipe

उपवासाची बटाटा जिलेबी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Jalebi Recipe in Marathi )

 • दोन उकडलेले बटाटे
 • अर्धा कप आरारूट पावडर
 • चिमूटभर रेड फूड कलर
 • चिमूटभर येलो फूड कलर
 • दोन चमचे दही
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • तळण्यासाठी तेल /तूप
 • पाक बनविण्यासाठी
 • एक कप साखर
 • अर्धा कप पाणी
 • पाव चमचा वेलची पूड

उपवासाची बटाटा जिलेबी | How to make Potato Jalebi Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात बटाटा कुसकरून घ्या त्यात आरारूट पावडर दही घाला. .
 2. त्यात चिमूटभर रेड येलो फूड कलर घाला
 3. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर तयार करा. .
 4. 10 मी..बाजूला ठेवून द्या. .
 5. तोपर्यंत पाक बनवून घ्या. .गॅस वर मंद आचे वर एका पातेल्यात साखर आणि पाणि टाकून चमचा ने हलवत राहा..
 6. एक तारी कच्चा पाक करून घ्या. .गॅस बंद करा. .
 7. गॅस वर पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 8. जिलेबी चे बॅटर पॅलसटिक कागदाच्या कोन मध्ये भरून एक छोटस होल पाडून तेलात जिलेबी पाडून घ्या. .
 9. दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या
 10. तेलातून काढून पाकात टाका दोन्ही बाजूंनी पाकात बुडवून डीश मध्ये काढून घ्या. .
 11. मस्त कुरकुरीत जिलेबी तयार
 12. अशाच सर्व करून घ्या.
 13. गरमागरम सर्व्ह करा ..वरून पिस्ता घालून सजवा..

My Tip:

बटाटा जिलेबीत आरारूट पावडर ऐवजी शिंगाडा पीठ पण घालू शकता. .

Reviews for Potato Jalebi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo