करंजी | Karanji Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Karanji recipe in Marathi,करंजी, Pranali Deshmukh
करंजीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

करंजी recipe

करंजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Karanji Recipe in Marathi )

 • राजगिरा पीठ 1 कप
 • वरई पीठ 1/4 कप
 • साबुदाणा पीठ 2 tbs
 • 1/4 कप साजूक तुप मोहन
 • बटाटे 2
 • ओला नारळ किसून 1/4 कप
 • शेंगदाणे कुट जाडसर 2 tbs
 • जिरे 1 tbs
 • मिरपूड 1/2 tbs
 • हिरवी मिरची 2 चिरून
 • तेल किंवा तूप 1 tbs
 • मीठ
 • साखर 1 tbs
 • लिंबाचा रस 1 tbs

करंजी | How to make Karanji Recipe in Marathi

 1. एका बाउल मध्ये सर्व पिठ घ्या त्यामध्ये मीठ आणि तूप घालून छान मिक्स करा पाणी घालून पीठ मळून घ्या आणि 10 मिनिट झाकून ठेवा.
 2. बटाटे सोलून किसून घ्या पाण्यात टाकून ठेवा.
 3. कढईत 1 tbs तेल किंवा तूप घाला
 4. तेल तापले कि जिरे मिरची घाला
 5. बटाट्याचा किस पिळून घाला
 6. वरून मिरपूड मीठ शेंगदाणे कूट आणि खोबरे घालून मिक्स करा.
 7. साखर आणि लिंबाचा रस घालून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या आणि थंड करा.
 8. आता पीठ मळून घ्या हाताला थोडं तूप लावून मळून घ्या
 9. छोटी गोळी घेऊन अलगद लाटा आणि करंजीच्या साच्यात ठेवा.
 10. वरून दोन्ही बाजूला चमच्याने बटाट्याची भाजी ठेवा
 11. साच्या बंद करून बाहेरील जास्तीचा भाग काढून घ्या.
 12. सर्व करंज्या याच प्रकारे करा वरून ब्रशनी तूप लावा.
 13. मायक्रोवेव्ह प्रीहीट करून 160°ला 10 मिनिट बेक करा
 14. जर बेक नसेल करायची तर सरळ तेलात किंवा तुपात तळून घ्या.
 15. खुसखुशीत करंजी तयार

Reviews for Karanji Recipe in Marathi (0)